Anand Mahindra esakal
देश

महिंद्रानी शेअर केलेल्या VIDEO वर नेटकऱ्यांनी शिकवले Traffic Rules

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावरील युजर्संनी बुधवारी चक्क उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांना वाहतूक नियमांचे धडे शिकवले.

नवी दिल्ली : सोशल मीडियावरील युजर्संनी बुधवारी चक्क उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांना वाहतूक नियमांचे धडे शिकवले. आनंद महिंद्रांनी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात 'ड्रायव्हरलेस' बाईक दिसत होती. महिंद्रा समूहाच्या अध्यक्षांना हा व्हिडिओ खूपच आवडला आणि त्यांनी लगेचच कॅप्शनसह व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. मात्र, त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया देत महिंद्रांना सल्लाही दिलाय.

दोन दिवसांपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @DoctorAjayita या वापरकर्त्यानं आपल्या अकाऊंटवर एक आश्चर्यकारक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत बाईकच्या मागच्या सीटवर एक माणूस बसलाय आणि समोरची ड्रायव्हरची सीट रिकामी आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बाईक खूप वेगाने धावत असून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही थोडा धक्काच बसेल. व्हिडिओ शेअर करताना, ट्विटर वापरकर्ता @DoctorAjayita डॉक्टर अजयितानं कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘एलोन मस्क म्हणाले, मला चालकविरहित वाहने भारतात आणायची आहेत’.

ट्विटरवर 85 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या आनंद महिंद्रांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलाय. हा व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘खूप आवडले.. मुसाफिर हूं यारों.. ना ड्राइवर है, ना ठिकाना..’ लोकांना हा व्हिडिओ प्रचंड आवडला. तसेच, आनंद महिंद्रांनी दिलेलं हे कॅप्शनही त्यांच्या पसंतीस उतरलंय. सुमारे 30 सेकंदांचा हा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune MH-12 RTO: पुण्याचा 'MH-12' नंबर इतिहासजमा होणार? RTO चा मोठा प्लॅन तयार; नवीन वाहनांना कोणता नंबर मिळणार?

Ajinkya Rahane: अजिंक्य निवृत्तीने कोलकाता नाइट रायडर्सचा भार हलका केला; IPL 2027 साठी फ्रँचायझी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Parliament canteen: संसदेच्या कँटीनमध्ये किती रुपयांना मिळतं जेवण? विविध पदार्थांचे दर काय? व्हेज-नॉनव्हेज थाळ्यांच्याही किंमती वाढल्या

Airport Rules: प्रवाशांना दिलासा! विमानतळावरील अतिरिक्त शुल्कांवर सरकारचा मोठा निर्णय; नियम लवकरच बदलणार?

Mumbai News: जुहू समुद्रकिनाऱ्यावर यांत्रिक जाळी, सागरी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT