massive explosion at a firecracker factory in Andhra Pradesh that killed 18 people and injured several others.

 

esakal

देश

Firecracker Factory Blast : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट!, १८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Firecracker Factory Explosion : मृतांचा आकडा वाढण्याची भीती ; जाणून घ्या, नेमकी कुठं घडली घटना?

Mayur Ratnaparkhe

Andhra Pradesh Firecracker Factory Explosion : आंध्र प्रदेशातून मोठी बातमी येत आहे. काकीनाडा जिल्ह्यातील एका फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात अठरा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

आंध्र प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी या घटनेची माहिती दिली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी सगिली शान मोहन यांच्या मते, जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

कामगार मोठ्या प्रमाणात फटाके बनवत असताना हा स्फोट झाला आणि भीषण आग लागली. अनेक लोक आत अडकले होते. प्राप्त माहितीनुसार २० हून अधिक कामगार घटनास्थळी उपस्थित होते.

स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. स्थानिक रहिवाशांनीही मदत केली. जखमींना रुग्णवाहिकेने रुग्णालयात नेण्यात आले. गंभीर भाजलेल्यांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोटात जवळच्या इमारतींचे नुकसान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; तिमाही निकालांमुळे ‘या’ शेअरवर सर्वांची नजर

Maharashtra U-17 Girls Cricket: ईश्वरी अवसरेचा धडाका! १२४ धावांची वादळी खेळी, महाराष्ट्राचा गुजरातवर दमदार विजय

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत भीषण अपघात; पिकअप-दुचाकी धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू

'दुचाकीवर स्वामी अन्...' देऊळ बंद २ चं पहिलं मोशन पोस्टर रिलीज, स्नेहल तरडेच्या डोळ्यात अश्रू, काय असेल कथा?

इथली जागा मुडदे गाडणारी, बेचैन आत्म्यांमुळे ग्रहण; चांगल्या जागेवर इमारत बांधा, शिंदेंच्या मंत्र्याचा महापालिकेला सल्ला

SCROLL FOR NEXT