Visakhapatnam Fire News Esakal
देश

Visakhapatnam Fire News: विशाखापट्टणम बंदराजवळ अग्नितांडव! एकापाठोपाठ ४० बोटी पेटल्या; मच्छिमारांचे 30 कोटींचं नुकसान

एका बोटीला लागलेली आग पुढे वाढत गेल्याने या घटनेत 40 बोटी जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये बोटींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

विशाखापट्टणम येथे भीषण आगीची घटना घडली आहे. शहरातील मासेमारी बंदरात एका बोटीत अचानक भीषण आग लागली आहे. एका बोटीला लागलेली आग पुढे वाढत गेल्याने या घटनेत 40 बोटी जळून खाक झाल्या आहेत. यामध्ये बोटींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

स्थानिकांनी अग्निशमन दलाला सूचना दिल्याने आग विझवण्यासाठी त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अज्ञात व्यक्तींनी जाणूनबुजून बोटींना आग लावली असावी असा संशय स्थानिक मच्छिमारांनी व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री मच्छीमारी करून अनेक बोटी किनाऱ्यावर परतलेल्या होत्या. यावेळी अचानक एका बोटीत स्फोट झाल्यासारखा आवाज आला. अचानक झालेल्या स्फोटामुळे मच्छीमारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. एका बोटीला लागलेली आग पुढे अनेक बोटींना लागली. आगीत तब्बल 40 बोटी जळून खाक झाल्या.

आग नेमकी कशी लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. काही मच्छीमारांनी या बोटीला आग लावली असावी असाही संशय अन्य मच्छीमारांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून अधिक तपास सुरू आहे.तसेच, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे.

विशाखापट्टणमचे पोलिस उपायुक्त आनंद रेड्डी म्हणाले, "विशाखापट्टणम मासेमारी बंदरात एका बोटीला आग लागली आणि नंतर मध्यरात्री सुमारे 35 फायबर-यंत्रित नौकांमध्ये पसरली. पोलिस आणि अग्निशमन दलाने तात्काळ प्रतिसाद दिला. आग विझवण्यात यश आले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT