netaji subhash chandra bose 
देश

सुभाषचंद्र बोसांच्या महत्तेचा वापर राजकारणासाठी; नेताजींच्या कन्येची नाराजी

सकाळ डिजिटल टीम

कोलकता : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची इंडियन नॅशनल आर्मी या संकल्पनेवरील पश्‍चिम बंगालच्या चित्ररथाला केंद्र सरकारने परवानगी नाकारल्यानंतर नेताजींच्या कन्या अनिता बोस-पफ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नेताजींच्या महानपणाचा वापर अनेकदा राजकारणासाठी केला गेला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

गेल्या वर्षी नेताजींच्या १२५ व्या जयंती वर्षाला सुरुवात झाली. मात्र, त्याचाही पश्‍चिम बंगालमधील निवडणूकीशी काही तरी संबंध होता, असा दावाही अनिता बोस यांनी केला. ‘चित्ररथाबाबतची बातमी मी ऐकली. ही परवानगी का नाकारली समजत नाही. काही तरी कारण असावे. माझ्या वडिलांची १२५ वी जयंती असताना त्यांची माहिती देणारा चित्ररथ नसावा, हे जरा विचित्र वाटते. गेल्या वर्षी जयंतीवर्षाची सुरुवात तर प्रचंड दणक्यात करण्यात आली होती. पश्‍चिम बंगालमधील निवडणूकीशी त्याचा निश्‍चितच काहीतरी संबंध असावा. या वर्षी तसे काही नसल्याने आता फारसे महत्त्व दिले गेले नसावे,’ असे अनिता बोस यांनी ‘पीटीआय’शी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले. अनिता बोस या जर्मनीत राहतात.

चित्ररथाला केंद्राने परवानगी नाकारल्याबद्दल पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आश्‍चर्य व्यक्त केले. या चित्ररथावर रवींद्रनाथ टागोर, ईश्‍वरचंद्र विद्यासागर, स्वामी विवेकानंद आणि श्री अरविंद यांच्याबाबतही माहिती चित्रीत करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT