PIA_Pakistani Air Hostess
PIA_Pakistani Air Hostess 
देश

Pakistani Air Hostess: पाकिस्तानच्या 9 एअर होस्टेस गायब! 'थँक्यू PIA' असा मेसेज लिहित कॅनडाकडं केलं उड्डाण अन्...

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सची (PIA) एक एअर होस्टेस सोमवारी अचानक कॅनडामध्ये दाखल झाल्यानंतर बेपत्ता झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कॅनडात ज्या हॉटेलमध्ये ती थांबली होती त्या खोलीत केवळ तिचा युनिफॉर्म आढळून आला. त्याचबरोबर 'थँक यू पीआयए' असं लिहिलेली एक चिठ्ठी आढळून आली आहे. (another pakistani air hostess flies to canada and goes missing at least 9 have vanished in last one year)

मरियम रजा नामक एअर होस्टेसनं २६ फेब्रुवारी रोजी PK782 या फ्लाईटमधून इस्लामाबादहून टोरंटोसाठी उड्डाण केलं. पण त्यानंतर दुसऱ्या दिवशी कराचीला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये तीची ड्युटी होती पण तीनं या फ्लाईटसाठी रिपोर्टिंग केलं नाही. ती ड्युटीवर का आली नाही याचा शोध घेण्यासाठी जेव्हा एअरलाईनचे अधिकारी तिच्या हॉटेलवर पोहोचले तेव्हा त्यांना केवळ या होस्टेसचा युनिफॉर्म तिच्या रुमवर मिळाला. विशेष म्हणजे या एअर होस्टेसचं कामाचं रेकॉर्डही चांगलं आहे. (Marathi Tajya Batmya)

वर्षभरात ९ एअर होस्टेस झाल्यात बेपत्ता

ही घटना सर्वसाधारण घटना नव्हे तर गंभीर घटना मानली जात आहे कारण पाकिस्तानच्या एअर होस्टेस परदेशात बेपत्ता होण्याची ही नववी घटना आहे. PIA च्या एअर होस्टेस विशेषतः कॅनडात रहस्यमयरित्या गायब झाल्या आहेत. यंदाच्या वर्षात २०२४ मध्ये घडलेला हा दुसरा प्रकार आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात एक एअर होस्टेस अशाच प्रकारे बेपत्ता झाली आहे. तसेच २०२३ मध्ये कमीत कमी ७ क्रू मेंबर्स कॅनडात ड्युटीवर असताना बेपत्ता झाल्या आहेत.

एव्हिएशन न्यूज वेबसाईटच्या माहितीनुसार, कॅनडासाठी उड्डाण केल्यानंतर पाकिस्तानी एअर होस्टेस बेपत्ता होण्याच्या घटना २०१९ पासून सुरु झाल्या आहेत. तर मिडईस्ट वेबसाईटच्या माहितीनुसार, २०१८ च्या सुरुवातीपासूनच कॅनडा आणि इतर देशांत शरण मागणाऱ्या पीआयएच्या एअर होस्टेस बेपत्ता होत आहेत. (Latest Marathi News)

बेपत्ता होण्यामागची ही आहेत कारण?

PIAच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कॅनडात शरण येत तिथली नागरिकता मिळवणं अगदीच सोपं आहे. यामुळं त्यांचा स्टाफ पाकिस्तानला पुन्हा परतण्यास इच्छुक दिसत नाही. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एक क्रू मेंबर जो ड्युटीवरुन पळून गेला होता तो आता कॅनडात स्थायिक झाला असून तिथेच शरणार्थी म्हणून राहण्यास इच्छुक आहे. त्याचमुळं इतरही चालक दलाच्या सदस्यांना अशाच प्रकारे कॅनडात स्थायिक होण्याचे सल्ले दिले जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT