Roche Farma India 
देश

कोविड रुग्णांसाठी मोठी बातमी; रोश इंडियाच्या अँटिबॉडी कॉकटेलला भारतात परवानगी

रोश ही कंपनी जागीतल सर्वात मोठी बायोलॉजिक्स उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : रोश इंडियाच्या (Roche India) अँटिबॉडी कॉकटेलला (Antibody cocktail) कोविड रुग्णांवर आपात्कालिन वापरासाठी भारतात परवानगी देण्यात आली आहे. डीसीजीआयनं (DCGI) अमेरिकेत कॉकटेलच्या वापरासाठी दिलेला डेटा आणि युरोपीयन संघातील मानवाच्या वापरासाठी औषधांच्या परवानगी समितीच्या मतांवर आधारित ही परवानगी दिली आहे. उल्लेखनीय गोष्ट ही आहे की, रोश ही कंपनी जागातील सर्वात मोठी बायोलॉजिक्स उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे.

याबाबत रोश इंडियाने एका निवदेनात म्हटलं, "आपात्कलीन वापरासाठी ही परवानगी मिळाल्यानंतर जागतीक स्तरावर उत्पादित केलं जाणारं हे उत्पादन भारतातही आयात करता येईल. हे औषध सिप्ला लिमिटेडसोबत भागीदारीत भारतात वितरित केलं जाईल. याचा वापर कोरोनाच्या सौम्य आणि मध्यम गंभीर रुग्णांवरील इलाजासाठी केला जाईल. ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि ते गंभीर आजारी पडण्याची शक्यता आहे अशा ज्येष्ठांना आणि लहान मुलांना हे औषध दिलं जाणार आहे. (१२ वर्षांवरील मुलांना ज्यांचं वजन ४० किलोपेक्षा कमी आहे)

रोश इंडियानं निवेदनात म्हटलं की, "रोशची अँटिबॉडी कॉकटेल हे औषध अधिक धोका असलेल्या रुग्णांसाठी मदतशीर ठरणार आहे. अशांची प्रकृती अधिक गंभीर होण्यापूर्वीच त्यांना हे औषध देण्यात येणार आहे." रोश फार्मा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. सिंपसन इमॅन्युएल म्हणाले, "भारतात कोविड-१९ संक्रमणाच्या वाढत्या प्रकरणांदरम्यान रोश असं प्रत्येक काम करण्यासाठी प्रतिबद्ध आहे ज्यामुळे रुग्णालयातील भरती कमी केली जाईल. तसेच सध्याच्या काळात देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताण आणि दबाव कमी केलं जाईल. हे कॉकटेल मोठी रुग्णालये आणि कोविड उपचार केंद्रांच्या माध्यमातूनच उपलब्ध करुन दिले जाणार आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT