anupam kher controversy statement
anupam kher controversy statement 
देश

'अशोक स्तंभावरील सिंह स्वतंत्र भारतातील, गरज पडल्यास डरकाळीही फोडेल'

सकाळ डिजिटल टीम

अशोक स्तंभावरील सिंह हा स्वतंत्र भारतातील, सिंहाला दात असतील तर तो दाखवणारच

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या छतावर बसवलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण केलं आहे. दरम्यान, नव्या संसद भवनाच्या इमारतीवर असलेल्या अशोक स्तंभातील सिंहाच्या चेहऱ्याची भावमुद्रा आक्रमक असल्याचं मत काहींनी व्यक्त केले आहे. भारताचे राष्ट्रचिन्ह अशोक स्तंभ बदलण्यात आल्याचे बोलले जात आहे. यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. आता या वादात अभिनेते अनुपम खैर यांनी उडी घेत एक ट्वीट केलं आहे. त्यामुळे यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

ट्वीटमध्ये अभिनेत्रे खैर म्हणतात की, नव्या अशोक स्तंभावरील सिंह हा स्वतंत्र भारतातील आहे. आणि सिंहाला दात असतील तर तो दाखवणारच तो स्वतंत्र्यातील सिंह आहे. गरज लागली तर तो चावेल सुद्धा असं म्हणत त्यांनी या सिंहाच्या चेहऱ्याची भावमुद्रेची पाठराखण करणारी भूमिका घेतली आहे. त्यामुळे यावरून आता पुन्हा एकदा गदारोळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देशाचं राष्ट्रीय प्रतिक असलेला अशोक स्तंभ वापरण्याची परवानगी सर्वसामान्य नागरिकांना नाही. केवळ घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीच याचा वापर करू शकतात. यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, लेफ्टनंट गव्हर्नर, न्यायपालिका आणि सरकारी संस्थांचे उच्च अधिकारी यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त एखाद्याने अशोक स्तंभाचा वापर केला तर त्यांना २ वर्षांचा तुरुंगवास आणि ५ हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

यासंदर्भात, संजय सिंह यांनी एक ट्विट शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे. मला 130 कोटी भारतीयांना विचारायचे आहे की राष्ट्रीय चिन्ह बदलणाऱ्यांना 'देशविरोधी' बोलायचे की नाही? मी 130 कोटी भारतीयांना विचारू इच्छितो की जे राष्ट्रीय चिन्ह बदलतात त्यांना 'देशद्रोही' बोलावे की नाही?, असा म्हणत त्यांनीही आणखी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT