anupam kher esakal
देश

PM मोदींच्या सुरक्षेवरुन अनुपम खेर म्हणाले - देव तारी, त्याला कोण मारी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचा मुद्दा देशात चांगलाच तापला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना बुधवारी (ता.पाच) सुरक्षेच्या कारणावरुन पंजाबमधील फिरोजपूरचा दौरा रद्द करावा लागला. त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा देशात चांगलाच तापला आहे. याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाब सरकारला अहवाल मागवला आहे. केंद्रीय मंत्र्यांपासून भाजप नेत्यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे. प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनीही यात उडी घेतली आहे. ते म्हणतात, आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सुरक्षेबाबत कुचराई झाली आहे. ही पंजाब पोलिस आणि सरकारसाठी खेदजनक आणि लाजीरवाणी गोष्ट आहे. या प्रकरणी देशाचे पंतप्रधानांविषयी काही लोकांचा तिरस्कार ही त्यांच्या भित्रेपणाचे लक्षण आहे. पण लक्षात ठेवा, देव तारी त्याला कोण मारी ! असे आपल्या ट्विटमध्ये म्हणत अनुपम खेर यांनी घडलेल्या घटनेचा निषेध केला आहे.(Anupam Kher Criticize Punjab Government Over PM Modi Security Issue)

काँग्रेस सरकार भाजपला इतके घाबरले आहे की ते आता पूर्णपणे अविचारी वृत्तीने वागत आहे. या प्रकाराबद्दल काँग्रेस सरकारने देशवासियांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्राचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनीही घडलेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT