C Voter survey 
देश

Lok Sabha Survey: मोदी सोडून PM म्हणून कोणाला पसंती? तमिळनाडूत भाजपला भोपळा? सी वोटरचा सर्व्हे आला समोर

Tamil Nadu C Voter survey :पंतप्रधान म्हणून देशाची जनता कोणाला किती पसंती देते याबाबत एक सर्व्हे करण्यात आला होता. यात अर्थात पहिल्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशात लोकसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. ४ जून रोजी जनता कोणाच्या पारड्यात यश टाकते हे स्पष्ट होईल. पण, पंतप्रधान म्हणून देशाची जनता कोणाला किती पसंती देते याबाबत एक सर्व्हे करण्यात आला होता. यात अर्थात पहिल्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. (Apart from Modi whom people prefer as Prime Minister)

एबीपी आणि सी वोटरने देशातील पंतप्रधानाच्या चेहऱ्याबाबत एक सर्व्हे केला होता. नरेंद्र मोदी यांनाच लोकांची पसंती असेल यावर सर्व्हेतून शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, देशातील इतर काही महत्त्वाच्या नेत्यांना जनता किती पसंती देते याबाबतही निकाल समोर आला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांना जनतेची काही प्रमाणात पसंती मिळाली आहे. (BJP zero seats in Tamil Nadu C Voter survey say)

राहुल गांधींची प्रसिद्धी वाढली?

सर्व्हेमध्ये पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याबाबत जनतेने राहुल गांधी यांना पसंती दिली आहे. सर्व्हेनुसार, ५८ टक्के जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून पाहायला आवडेल असं मत दिलंय, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राहुल गांधींना १६ टक्के जनतेने पसंती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची गेल्या काही वर्षात प्रसिद्धी वाढली असल्याचं दिसून येत आहे.

अरविंद केजरीवाल हे यादीमध्ये तिसऱ्या स्थानी आहेत. २ टक्के लोक अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितात. सर्व्हेमध्ये अखिलेश यादव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देखील स्थान आहे. अखिलेश यादव हे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासोबत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत. १ टक्के जनतेने ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान म्हणून पसंत केले आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला पार पडणार आहे. त्याआधी १७ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील प्रचार संपणार आहे.

तमिळनाडूमधील धक्कादायक कल

सी वोटरच्या सर्व्हेमध्ये तमिळनाडूमध्ये भाजपला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तमिळनाडूमध्ये लोकसभेच्या ३९ जागा आहेत. यातील ९ जागा काँग्रेसला तर ३० जागा डीएमकेला मिळतील असा अंदाज आहे. राज्यात डीएमके आणि काँग्रेसने आघाडी केली आहे. भाजपला राज्यामध्ये सपशेल अपयश येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ashok Saraf : कार्यक्रम अशोक सराफ यांच्या पुरस्काराचा, चर्चा मुश्रीफ, बंटी पाटील, उदय सामंत यांच्या राजकीय टोलेबाजीची, मामाही म्हणाले...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

प्रेमसंबंधाचा संशय! लेकीला हात बांधून कालव्यात ढकललं, बापाने व्हिडीओसुद्धा शूट केला; आई अन् लहान भाऊ बघत राहिले

Hot Chocolate For Periods: पीरियड्समध्ये हॉट चॉकलेट का प्यावं? जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Mumbai News: मुंबईकरांचा त्रास कमी होणार! पाऊस थांबताच काँक्रीटीकरणाला सुरुवात; पालिकेची खड्डेमुक्त शहराकडे वाटचाल

SCROLL FOR NEXT