Cow Hug Day Sakal
देश

Cow Hug Day Withdrawn: मोठ्या वादानंतर अखेर केंद्राकडून 'काऊ हग डे'चं आवाहन मागे!

सरकारच्या या आवाहनानंतर विविध स्तरातून यावर मोठा वाद निर्माण झाला होता.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : 'व्हॅलेंटाईन डे' दिनी १४ फेब्रुवारी रोजी 'काऊ हग डे' अर्थात गो अलिंगन दिन साजरा करण्याचं आवाहन केंद्र सरकारकडून देशवासियांना करण्यात आलं होतं. पण यावरुन मोठा वाद निर्माण झाल्यानंतर आता सरकारनं आपलं हे आवाहन मागं घेतलं आहे.

यासंदर्भात ८ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रीय पशु कल्याण मंडळानं व्हॅलेंटाईन डे ऐवजी 14 फेब्रुवारीला 'काऊ हग डे' साजरा करण्याचं आवाहन जनतेला केलं होतं. 14 फेब्रुवारीला गायींना मिठी मारून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करावं आणि व्हॅलेंटाईन डे ऐवजी 'काऊ हग डे' साजरा करावा, हे आवाहान होतं.

यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकात म्हटलं होतं की, आपल्या सर्वांना माहित आहे गाय भारतीय संस्कृतीचा आधार आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटापुढे आपण आपली संस्कृती आणि वारसा विसरलो आहोत. गायीला मिठी मारल्यानं भावनिक उन्नती होते. म्हणूनच गाईवर प्रेम करणाऱ्या लोकांनी १४ फेब्रुवारीला 'काऊ हग डे' साजरा करावा. तसेच हा दिवस साजरा करताना गायीला आपली माता समजा असं या परिपत्रकात म्हटलं होतं.

हे ही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

'काऊ हग डे'वरुन उद्भवला होता वाद

केंद्राचं हे आवाहन प्रत्यक्षात शक्य नसल्याचं सांगत. विविध स्तरातून यावरुन केंद्र सरकारला टार्गेट करण्यात आलं होतं. केंद्राकडून आपला धार्मिक अजेंटा विनाकारण रेटला जात असल्याचा आरोप नुकताच शिवसेनेनं केला होता. तसेच सोशल मीडियातून नेटकऱ्यांनी याची मोठी खिल्ली उडवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT