narawane.jpg
narawane.jpg 
देश

लष्करप्रमुख वापरतात पर्सनल एअर सॅनिटायझर; एक मीटर हवेतील सूक्ष्मजीवांपासून देतो संरक्षण

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या छातीवर नेहमीच्या बॅजेसव्यतिरिक्त नवा बॅज दिसतो आहे. तेजपूर (आसाम) दौऱ्यात तो उठून दिसला होता. पण तो सरकारी बॅज नव्हता, तर तो होता ‘पर्सनल एअर सॅनिटायझर’. अमेरिकेतील ‘इकोशिल्ड’ कंपनीने असा सॅनिटायझर बनवलाय, त्याची किंमत आहे सुमारे २० डॉलर (साधारणतः पंधराशे रुपये). या पाऊचला ‘क्लिप ऑन पाऊच’ म्हणतात. जी व्यक्ती तो वापरेल तिच्यापासूनच्या तीन फूट त्रिज्येतील (सुमारे एक मीटर) हवेतील संसर्गजन्य सूक्ष्मजीवांचा नायनाट होतो. एक पाऊच तीस दिवस संरक्षण देतो. 

ऐश्वर्याच्या मदतीसाठी आदित्य ठाकरेंनी मध्यरात्री हलविली प्रशासकीय यंत्रणा!

अमेरिका, जपानची आघाडी 

हा पाऊच बनवणारी इकोशिल्ड ही एकमेव कंपनी नाही, जपानी कंपनी कीयू जाकीगिकू या कंपनीनेही असेच पाऊच बाजारात आणले आहेत. त्यांची भारतात विक्रीही सुरू आहे. क्लोरीन डायऑक्साईड प्रामुख्याने रुग्णालयात, कागद उद्योगात ब्लिचिंग एजंट आणि पोहण्याच्या तलावांमध्ये निर्जंतुकीकरणासाठी वापरतात. असे पाऊच बनवणाऱ्या कंपन्या शीत ज्वर, सर्दी आणि प्लू, अॅलर्जी, एच१एन१, न्यूमोनिया, क्षयरोग आणि श्वसनाच्या इतर संसर्गांवर परिणामकारक ठरू शकतो. तथापि, ‘कोविड-१९’ वर हा पाऊच उपयुक्त आहे, असा दावा उत्पादक कंपन्यांनी केलेला नाही. 

सातत्याने क्लोरिन डायऑक्साईडच्या वातावरणात राहिल्यास त्याचे परिणाम काय होतात, याचा अभ्यास फारसा झालेला नाही. तो पाण्यात सहज विरघळतो. तथापि, तीव्र क्लोरिन डायऑक्साईडच्या संपर्कात दीर्घकाळ राहिल्यास डोळे आणि श्वसनसंस्थेत जळजळ होऊ शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. 

अमेरिकी सरकारच्या ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हझार्ड अॅडमिनिस्ट्रेशननुसार (ओएसएचए), औद्योगिक वातावरणात क्लोरीन डायऑक्साईडची पातळी ही ०.१ पार्टस् पर मिलियन (पीपीएम) किंवा ०.३ मिलीग्रॅम प्रति घनमीटर चालू शकते. 

क्लोरीन ऑक्साईडचा वापर 

‘कीयू जाकीगिकू‘ने अशा एअर प्युरिफायर पाऊचची खुल्या हवेतील उपयुक्तता किती, यावर काहीही भाष्य केलेले नाही. दोन्हीही कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांमधून बाहेर पडणाऱ्या क्लोरीन ऑक्साईडची पातळी सुरक्षित असल्याचा दावा केलाय, मात्र त्याला अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मान्य केलेले नाही. 

जुनागढ नव्या नकाशात दाखवल्यानंतर पाकिस्तानची पुढची चाल; तैनात केली लढाऊ विमाने
 

कीयू जाकीगिकूने भारतात हे उत्पादन ‘एअर डॉक्टर' नावाने आणलेले आहे. यात सोडियम क्लोराईट आणि नॅचरल झिओलाईट आहे. ते विषाणूंपासून संरक्षण देते. एअर डॉक्टर छातीवर लटकवता येते, पाकिटात किंवा बॅगेत ठेवता येते. ते क्लोरीन डायऑक्साईड सोडते. 

आजारी तसेच निरोगी व्यक्तींना हे पाऊच उपयुक्त ठरते, असे कंपनीचे म्हणणे आहे. कार्यालये, बँका, शोरूम, शैक्षणिक व इतर संस्था, तसेच जोखमीचे काम करणारे पोलिस, आरोग्य कर्मचारी, अग्निशमन कर्मचारी अशांना ते उपयोगी ठरू शकते. वातानुकूलीत जागेत किंवा त्याबाहेरही ते वापरता येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT