Terrorist Attack in Jammu Kashmir  Sakal
देश

Jammu Kashmir : शोपियात दोन जवान शहीद; दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु

सकाळपासून या भागात चकमक सुरू आहे.

सुधीर काकडे

श्रीनगर : गेल्या काही तासांपासून काश्मीरमधील शोपियात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. या चकमकीत सकाळी एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं होतं. आता या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. शोपियातील झैनपोरा भागात ही चकमक सुरु आहे. (Two Army jawans lost their lives Shopian, jammu kashmir)

सुरक्षा दलाने झैनपोरा भागातील चेरमार्ग इथं एका दहशतवाद्याला ठार केलं होतं. पोलिस आणि सुरक्षा दलाने संयुक्त शोधमोहिम सकाळपासून या परिसरात राबवली आहे. अद्याप काही दहशतवादी परिसरात लपून बसल्याची शक्यता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

या परिसरात जवानांकडून शोधमोहीम राबविण्यात येतेय. या परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने याठिकाणी शोध मोहीम सुरू केली. जवानांचं पथक संशयित ठिकाणांकडे जात असताना तिथे लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात एक दहशतवादी मारला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २ तरुणींचा १९ वर्षीय तरुणावर पहाटे कोयत्यानं हल्ला, घटना CCTVत कैद; धक्कादायक कारण समोर

Dodamarg Eco-Sensitive Area : 'महाराष्ट्राचे ॲमेझॉन' धोक्यात! केंद्राकडून दोडामार्ग तालुका वगळण्याची 'घोड चूक'; वनशक्ती संस्थेचे सरकारला थेट पत्र

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

SCROLL FOR NEXT