arnab whatsapp chat
arnab whatsapp chat 
देश

अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ; व्हायरल चॅटनंतर Balakot ट्विटरवर ट्रेंड

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी आणि टीव्ही रेटिंग एजन्सी BARC चे माजी CEO पार्थ दासगुप्ता यांच्या दरम्यानचे व्हॉट्सएप चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि यानंत एकच खळबळ माजली आहे. आधीच अडचणीत असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पार्थ हे टीआरपी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा गुन्हे शाखेने अलीकडेच दाखल के लेल्या पुरवणी आरोपत्रात केला आहे. याच पुरवणी आरोपपत्रात पार्थ आणि गोस्वामी यांच्यात 2017 पासून झालेले व्हॉट्सअ‍ॅप संवाद गुन्हे शाखेने पुराव्यादाखल न्यायालयासमोर ठेवले आहेत. आरोपत्रातील हे संवाद सुमारे 500 पानांचे आहेत.

यामध्ये अनेक मंत्र्यांविषयी भाष्य आहे. तसेच बालाकोट एअर स्ट्राईक आधीपासूनच अर्णब गोस्वामी यांना माहिती होता, असं दाखवून देणारी चर्चा देखील आहे. यानंतर ट्विटरवर शनिवार संध्याकाळपासूनच Balakot ट्रेंड होऊ लागले. असा दावा केला जातोय की, बालाकोट स्ट्राईकच्या तीन दिवस आधीपासूनच अर्णब गोस्वामी यांनी व्हॉट्सएप चॅटवर म्हटलं होतं की काही मोठी घटना घडणार आहे. याचे स्क्रीनशॉट देखील शेअर केले जात आहेत. यानंतर ट्विटरवर अर्णब गोस्वामीचे समर्थक आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपली. सैन्याच्या गोपनीय कारवाईची माहिती याप्रकारे आधीच एखाद्याला माहिती होणे, यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. तर काही लोक या साऱ्या प्रकरणाला प्रोपगंडा असल्याचं म्हणत आहेत. यावर सुप्रसिद्ध वकिल प्रशांत भुषण यांनी प्रश्न केले आहेत.

500 पानांचे चॅट
BARC चे माजी CEO पार्थ दासगुप्ता आणि रिपब्लिक वाहिन्यांचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप संवाद शुक्रवारी सोशल मीडियावर प्रसारित झाले. त्यात केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांचा उल्लेख निष्क्रिय (यूजलेस) असा केला आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या संवादांत सर्व मंत्री आपल्याबरोबर आहेत, असंही म्हटलेलं दिसून येतंय.

पाकिस्तानात देखील होतेय चर्चा
फक्त भारतातच नाही तर याबाबतची चर्चा पाकिस्तानात देखील होत आहे. पाकिस्तान सरकारमधील केंद्रीय मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी अर्णब गोस्वामी यांच्या या व्हॉट्सऍप चॅटचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. 

सामान्य हल्ल्यापेक्षा मोठा...
असा दावा केला जातोय की 23 फेब्रुवारी 2019 रोजी व्हॉट्सऍप चॅटमध्ये अर्णब यांनी Broadcast Audience Research Council चे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांना चॅटमध्ये 'सामान्य हल्ल्यापेक्षा मोठा...' असं म्हटलं होतं. त्यानंतर तीनच दिवसांनंतर 26 फेब्रुवारी 2019 ला भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी 2019 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केला होता. पुलवामामध्ये CRPF चे 40 जवान शहीद झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT