Art work of Nashikkar artists will be displayed at Ayodhya airport Nashik News  esakal
देश

Ayodhya Ram Mandir : अयोध्या विमानतळावर झळकणार नाशिककर कलावंतांचा कलाविष्कार

अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाशिकच्‍या कलावंतांनी साकारलेला कलाविष्कार.

सकाळ वृत्तसेवा

Ayodhya Ram Mandir : अयोध्या मंदिरात होत असलेल्‍या अभूतपूर्व सोहळ्याकडे संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागले असून, या नगरीत उभारलेले आंतरराष्ट्रीय स्‍तरावरील विमानतळ शनिवार (ता. ३०) पासून प्रवाशांसाठी खुले होणार आहे.

आनंददायी बाब म्‍हणजे या विमानतळावर नाशिकच्‍या कलावंतांनी कॅनव्‍हासवर साकारलेली कलाकृती झळकणार आहे. (Art work of Nashikkar artists will be displayed at Ayodhya airport Nashik News )

कलामकारी आणि पट्टाचित्र शैलीचे फ्युजन घडविताना कलावंतांनी दोन कलाकृती साकारल्‍या आहेत. विमानतळाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते पार पडणार आहे. राम मंदिराच्या उभारणीनिमित्त सर्वत्र उत्‍साहाचे वातावरण असून, विमानतळाचे इंटेरीयर देखील या दृष्टिकोनातून साकारण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे विमानतळ साकारण्यात अनेक हातांनी परीश्रम घेतले आहे. यामध्ये नाशिकच्‍या कलावंतांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. विवेक सोनवणे, आनंद सोनवणे, प्रवीण म. व., आणि एस. काळुसकर या कलावंतांनी या कलाकृती साकारल्‍या आहेत. विमानतळाच्‍या उद्‌घाटनानंतर देश-विदेशातील पर्यटकांचे लक्ष वेधणार असल्‍याचा विश्‍वास व्‍यक्‍त केला जातो आहे.

अयोध्या विमानतळावर झळकणार नाशिककर कलावंतांचा कलाविष्कार

रामाचा जीवनप्रवास प्रेरणादायी

प्रवेशद्वारावर तिनशे फूट कॅनव्हासवर चौदा विभागांमध्ये प्रभू श्रीरामाच्‍या जन्‍मापासून तर रावणाचा वध आणि श्रीराम पुन्‍हा अयोध्येत परतेपर्यंतचा जीवनप्रवास वर्णन केला आहे. कलामकारी आणि पट्टाचित्र शैलीचे मिश्रण यामध्ये घडविले आहे.

हनुमानाची भक्‍ती कलाकृतीतून

प्रभू श्रीरामाप्रमाणेच हनुमानाचाही जीवनपट कलाकृतीतून दाखविण्याची संधी या कलावंतांना मिळाली. हा दुसरा कॅनव्हास हनुमान चालिसातून रेखाटलेल्या हनुमानाचे जीवन उलगडतो. १६ विभागांमधील या प्रवासाच्या भावनिक गहराईचा अभ्यास करते. सोबतच कलामकारी आणि पट्टाचित्र तंत्रे दृष्य कथन तयार करून चैतन्य निर्माण करतात.

अयोध्या विमानतळावर झळकणार नाशिककर कलावंतांचा कलाविष्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी गोळ्या झाडल्या, नंतर कोयत्यानं डोक्यात वार; गणेश काळेच्या हत्याकांडाचा CCTV VIDEO VIRAL

Wrestler Sikandar Sheikh : सिकंदर शेखची पैसा-प्रसिद्धीमुळे कुस्तीशी गद्दारी, वस्तादांसह पैलवान काय म्हणाले...

Maharashtra Protest : महाराष्ट्रात जाण्याचा पुन्हा एकदा वज्रनिर्धार, काळा दिनाच्या निषेध फेरीत हजारो मराठी भाषक सहभागी

Pune Weather Update : पुण्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता नाही, नागरिकांना दिलासा

Ganesh Kale Murder Case: काळे हत्येचा धागा आंदेकर टोळीपर्यंत? आरोपींची नावे अन् ‘कनेक्शन’ समोर... मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT