हिमस्खलन हिमस्खलन
देश

अरुणाचल प्रदेश : कामेंग सेक्टरमध्ये अडकलेल्या लष्कराच्या सातही जवानांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमध्ये ६ फेब्रुवारी रोजी हिमस्खलनात (Avalanche) सापडलेले सातही बेपत्ता लष्करी जवान शहीद झाले आहेत. हिमस्खलनाच्या ठिकाणाहून शहीद जावानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सातही लष्करी जवान गस्ती दलाचा भाग होते. ते तवांग जिल्ह्यात हिमस्खलनात बेपत्ता झाले होते, असे एएनआय या वृत्तसंस्थेने लष्कराच्या हवाल्याने सांगितले आहे.

१९ जेएके रायफल्सचे सात जवान मॅमी हटजवळील भागात हिमस्खलनात अडकले (Seven soldiers were trapped) होते. या घटनेनंतर लष्कराच्या अधिकाऱ्यांनी जंग पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. हा परिसर अगदी दुर्गम आहे आणि बर्फवृष्टीमुळे सर्व रस्ते बंद आहेत. ही घटना रविवारी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) घडली होती, असे दिरांग पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सांग थिनले यांनी सांगितले होते.

हिवाळ्याच्या महिन्यांत उंचावरील भागात गस्त घालणे कठीण होते. यापूर्वीही अशा घटनांमध्ये लष्कराने आपले जवान गमावले आहेत. मे २०२० मध्ये सिक्कीममध्ये हिमस्खलन (Avalanche) झाले होते. यावेळी दोन लष्करी जवानांचा मृत्यू झाला होता. तसेच ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या हिमस्खलनात पाच नौदलाचे जवान मरण पावले होते.

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये उत्तराखंडमधील त्रिशूल पर्वतावर नौदलाचे पाच जवान एका मोहिमेवर असताना हिमस्खलनात अडकले (Seven soldiers were trapped) होते. नंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. फेब्रुवारी २०२० मध्ये सरकारने संसदेत सांगितले की, २०१९ मध्ये सियाचीन ग्लेशियरमध्ये हिमस्खलनात सहा लष्करी जवानांचा मृत्यू झाला होता, तर इतरत्र अशाच घटनांमध्ये २२ जणांचा मृत्यू झाला होता.

रविवारच्या घटनेनंतर तेजपूर स्थित संरक्षण पीआरओ लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन पांडे यांनी सांगितले होते की, शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. बचाव कार्यात मदत करण्यासाठी विशेष पथकांना एअरलिफ्ट करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून या भागात जोरदार बर्फवृष्टी होत असल्याने हवामान खराब झाले आहे. अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमध्ये हिमस्खलनात (Avalanche) सापडलेले सातही बेपत्ता लष्करी जवान शहीद झाल्याचे सोमवारी लष्कराने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT