Arvind Kejriwal accused number 37 in ED new chargesheet AAP Delhi excise policy case  
देश

Arvind Kejriwal News : केजरीवालांनीच कट रचला, तेच मुख्य सूत्रधार... ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात केले मोठे खुलासे

Arvind Kejriwal News : बीआरएस नेत्या के. ​कविता यांचे सहायक असलेल्या विनोद चौहानच्या मार्फत 25.5 कोटी रुपये गोवा निवडणुकीसाठी 'आप'पर्यंत पोहोचविण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : बहुचर्चित मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी दोषारोपपत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 37 व्या क्रमांकाचे तर आम आदमी पक्षाला 38 व्या क्रमांकाचे आरोपी बनविण्यात आले आहे. केजरीवाल यांनी गैरव्यवहाराचा कट रचला होता आणि तेच मुख्य सूत्रधार असल्याचे दोषारोप पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दक्षिण लॉबीला मद्य वितरणाचे परवाने देण्याच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात लाच घेण्यात आली. लाचेचा पैसा गोवा विधानसभा निवडणुकीत वापरला जाणार असल्याची माहिती केजरीवाल यांना होती तसेच कटात ते सामील होते, असे सांगतानाच आरोपी विनोद चौहान याच्यासोबत व्हॉट्सअॅपवर झालेल्या संदेश आदानप्रदानाची माहिती दोषारोपपत्रात देण्यात आली आहे.

बीआरएस नेत्या के. ​कविता यांचे सहायक असलेल्या विनोद चौहानच्या मार्फत 25.5 कोटी रुपये गोवा निवडणुकीसाठी 'आप'पर्यंत पोहोचविण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे. विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्ती कावेरी बावेजा यांच्या न्यायालयासमोर ईडीने 17 मे रोजी सातवे अतिरिक्त दोषारोपपत्र दाखल केले होते, त्यात 'आप' ला आरोपी बनविण्यात आले होते. तर आठवे अतिरिक्त दोषारोपपत्र अलिकडेच दाखल करण्यात आले होते. या दोषारोपपत्रात विनोद चौहान आणि आशिष माथूर यांना आरोपी करण्यात आले होते. दोन्ही आरोपींना ईडीकडून शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT