देश

दिल्लीची ऑक्सिजन चिंता मिटणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

नामदेव कुंभार

Delhi Oxygen Concentrator Banks : राजधानी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांचा (coronavirus) आलेख खालावत आहे. लॉकडाउन लावल्यामुळे परिस्थिती सुधारत असल्याचं चित्र आहे. दुसऱ्या लाटेत राजधानी दिल्लीतील (Delhi) आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा पाहात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. राजधानी दिल्लीमध्ये ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेरची बँक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. शनिवारपासून या योजनेची अमलबजावणी होणार आहे. घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांना या योजनेचा लाभ होणार आहे. तर आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल, असा विश्वास अनेक तज्ज्ञांना आहे. (Arvind Kejriwal Announces Delhi Oxygen Concentrator Banks, Home Delivery)

राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) अनेक कोरोना रग्णांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. या रुग्णांना कधीही ऑक्सिजनची आवशकता भासू शकते. अशा रुग्णांना आता घरोपच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर(Oxygen Concentrator) मिळणार आहे. रुग्णांच्या मागणीनंतर अवघ्या दोन तासांत ऑक्सिजन घरपोच मिळणार आहे. ज्यानी कोरोनावर मात केली आहे अशा अशा रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासल्यास त्यांनाही ही सेवा घेता येणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी याची घोषणा केली आहे. ‘आजपासून दिल्लीत ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर बँक सुरु करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात २०० ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर बँक असतील. मेडिकल ऑक्सिजन वेळेत उपलब्ध न झाल्यास अनेक रुग्णांना ICU मध्ये भरती करावं लागतं. त्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यूही होतो. त्यामुळे ही समस्या सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे’, असं ट्विट मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे.

गेल्या काही दिवसांत राजधानीमध्ये ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला होता. ऑक्सिजनमुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्याआरोपाच्या फैरीही झडल्या. अखेर कोर्टानं हस्तक्षेप करत राज्य आणि केंद्राला आपल्या जबाबदारीची आठवण करुन दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT