नरेंद्र मोदी 
देश

नियम बदला पण यानांच भारतरत्न द्या!, PM मोदींकडे मागणी

नामदेव कुंभार

मागील दोन वर्षांपासून भारतासह जगावर कोरोना महामारीचं संकट आहे. या महामारीमध्ये डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी रुग्णांसाठी देव ठरत आहेत. आपल्या जिवाची बाजी लावून दिवसरात्र आपलं कर्तव्य बजावत आहेत. अशाच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक खास मागणी केली आहे. कोरोना काळात आपली सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना यंदाचा भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे. यासाठी हवे तर नियमात बदल करा... अशी सुचनाही केजरीवाल यांनी दिली आहे.

कोरोना महामारीमध्ये आपलं कर्तव्य बजावत असताना अनेक डॉक्टरांचा प्राणही गेले आहेत. अशा डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान व्हायला हवा, अशी भूमिका केजरीवाल यांनी घेतली आहे. केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटलेय की, 'यंदा भारतीय डॉक्टरांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात यायला हवं. भारतीय डॉक्टर म्हणजेच, सर्व डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल स्टाप होय. कोरोना काळात मृत्यू पावलेल्या डॉक्टरांना ही खरी श्रद्धांजली असेल, असेही केजरीवाल यांनी म्हटलेय. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना भारतरत्न दिल्यास संपूर्ण देश खूश होईल.'

जर नियमांनुसार, एखाद्या समुहाला भारतरत्न देता येत नसेल, तर नियमांत बदल करा. आज संपूर्ण देश डॉक्टारांचा आभारी आहे. जर डॉक्टरांना भारतरत्न दिला, तर संपूर्ण देशाला आनंद होईल, असं केजरीवाल यांनी पत्रात म्हटलेय.

देशात गेल्या दीड वर्षात कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या जवळपास बाराशे डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात राज्यातील ७०; तर मुंबईतील २५ डॉक्टरांचा समावेश आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT