Arvind Kejriwal esakal
देश

Arvind Kejriwal : केजरीवालांच्या खानपानावरुन ईडीने कोर्टात केलेल्या दाव्याला आतिशींचं प्रत्युत्तर; म्हणाल्या...

मंत्री आतिशी यांनी भाजपवरही निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरचं जेवण मिळू नये, यासाठी षड्यंत्र केलं जात आहे. भाजप ईडीच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीला नुकसान पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

संतोष कानडे

Arvind Kejriwal Health Updates : कथित मद्य धोरण घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जेलमध्ये आहेत. केजरीवालांच्या प्रकृतीबाबतच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीमध्ये ईडीने केजरीवाल हे जास्त प्रमाणात गोड खात असल्याचं म्हटलं होतं. आपच्या मंत्री आतिशी यांनी मात्र हा दावा खोडून काढला आहे.

मंत्री आतिशी यांनी भाजपवरही निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरचं जेवण मिळू नये, यासाठी षड्यंत्र केलं जात आहे. भाजप ईडीच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीला नुकसान पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

आतिशी म्हणाल्या की, ईडीने कोर्टात खोटं सांगितलं की, केजरीवाल हे जेलमधला गोड चहा पितात आणि मिठाई खातात. सीएम अल्टरनेटिव्ह शुगर घेतात, असं आतिशी यांनी सांगितलं. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जीव घेण्यासाठी भाजप कटकारस्थान रचत आहे कारण केजरीवाल हे असे व्यक्ती आहेत ज्यांना दिल्लीमध्ये भाजप हरवू शकलेलं नाही, असंही आतिशी म्हणाल्या.

ईडीने कोर्टात कोणता दावा केला?

कोर्टासमोर ईडीने म्हटलं की, केजरीवाल यांना टाईप २ चा मधुमेहाचा आजार आहे. ते जेलमध्ये बटाटा-पुरी, आंबे आणि गोड खात आहेत. असं ते जाणीवपूर्वक करत आहेत. हा एक प्रकारे मेडिकलच्या आधारावर जामीन घेण्याचा प्रकार आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या प्रकृतीवरुन ईडीने म्हटलं की, कोर्टाने केजरीवाल यांना घरचं जेवण खाण्याची मुभा दिली आहे. जेल डीजींनी आम्हाला केजरीवाल यांच्या आहाराविषयी माहिती दिली आहे. त्यांना बीपीचा आजार आहे. तरीही ते बटाटा-पुरी, केळी, आंबे आणि गरजेपेक्षा गोड पदार्थ खात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT