Arvind Kejariwal 
देश

दिल्ली दंगलीत झालेली भावाची हत्या; 'आप' सरकारनं दिली सरकारी नोकरी

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या वर्षी अंकित शर्मा यांच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांचा धनादेश मदत निधी म्हणून दिला होता.

दिल्लीत २०२० मध्ये झालेल्या दंगलीत अनेकांचे प्राण गेले होते. यात इंटेलिजन्स ब्युरोचे कर्मचारी अंकित शर्मा यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. आता दिल्ली सरकारने त्यांचे भाऊ अंकुर शर्मा यांना शिक्षण विभागात नोकरी दिली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज त्यांच्या कुटुंबियांकडे सरकारी नोकरीचे पत्र सोपवले.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या वर्षी अंकित शर्मा यांच्या कुटुंबाला १ कोटी रुपयांचा धनादेश मदत निधी म्हणून दिला होता. दिल्ली सरकारने आता अंकित शर्मा यांचा भाऊ अंकुर शर्मा यांना शिक्षण विभागात नोकरी दिली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं की, माणसाची जागा भरून काढता येणार नाही, मात्र सरकारी नोकरी आणि मदत निधीने कुटुंबाला बळ मिळेल.

राजधानी दिल्लीत फेब्रुवारी २०२० मध्ये दंगल उसळली होती. या दंगलीवेळी अंकित शर्मा यांची हत्या करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात त्यांच्या निर्घृण हत्येबद्दल सांगण्यात आलं होतं. या प्रकरणी आम आदमी पार्टीच्या ताहीर हुसैन यांच्यासह १० लोकांना अटकसुद्धा करण्यात आली होती. दिल्लीत झालेल्या या दंगलीत जवळपास ५३ जणांचा मृत्यू झाला होता तर ४०० हून अधिक लोक जखमी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT