cm arvind kejriwal  esakal
देश

Arvind Kejriwal Health : अरविंद केजरीवाल यांची प्रकृती खालावली; शुगर लेव्हल 46 ने घसरली

Arvind Kejriwal Arrest Updates : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने कारवाई करत अटक केली आहे. कोर्टाने केजरीवालांना ईडी कोठडी सुनावली असून ते जेलमधूनच ते सरकारचं कामकाज बघत आहेत.

संतोष कानडे

Arvind Kejriwal Arrest Updates : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने कारवाई करत अटक केली आहे. कोर्टाने केजरीवालांना ईडी कोठडी सुनावली असून जेलमधूनच ते सरकारचं कामकाज बघत आहेत.

दरम्यान, केजरीवालांची प्रकृती बिघडल्याची माहिती येत आहे. सूत्रांनी सांगितलं की, ईडी कोठडीमध्ये असलेल्या केजरीवाल यांची शुगर लेव्हल लो झाली आहे. मागच्या काही तासांपासून शुगर खाली-वर येत असल्याची माहिती आहे. केजरीवाल यांचं शुगर लेव्हल ४६ पर्यंत खाली गेलं आहे. अशा पद्धतीने शुगर खाली जाणं धोक्याचं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

कोठडीतून दिले आदेश

दिल्लीच्या काही भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे, त्यावर तोडगा काढावा, असे आदेश केजरीवाल यांनी पाणीपुरवठा मंत्री आतिशी यांना ईडीच्या कोठडीतून दिले. यावर आतिशी यांनी पत्रकार परिषद आयोजित करत केजरीवाल यांना अटक झाली असली तरी दिल्लीकरांचे कोणतेही काम अडणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. केजरीवाल यांनी दिल्लीच्या लोकांचे हित लक्षात घेऊन आदेश दिला. हा आदेश पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात अश्रू आले, असेही त्या म्हणाल्या होत्या.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीने अटक केली. दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेले आहेत. शुक्रवारी कोर्टाने त्यांना सहा दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT