Arvind Kejriwal's letter to RSS Chief Mohan Bhagwat questions PM Modi's policies and political strategies esakal
देश

अडवाणींवर लागू झालेला निवृत्तीचा नियम मोदींवर का लागू होत नाही? केजरीवालांचे मोहन भागवतांना पत्र, विचारले 5 महत्वाचे प्रश्न

Arvind Kejriwal's letter to RSS Chief Mohan Bhagwat: अरविंद केजरीवाल यांनी या पत्राद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांना विविध विषयांवर विचारलेल्या प्रश्नांनी देशाच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर गंभीर चर्चा घडवून आणली आहे. त्यांच्या या प्रश्नांना भागवत काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Sandip Kapde

Latest Political News Updates in Marathi: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांना पत्र लिहून पाच महत्वाचे प्रश्न विचारले आहेत. या पत्रामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीपासून इतर अनेक मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितले आहे. केजरीवाल यांनी सांगितले की, हे पत्र त्यांनी राजकीय नेता म्हणून नव्हे, तर एक सामान्य नागरिक म्हणून लिहिले आहे.

पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीचा प्रश्न-

केजरीवाल यांनी पत्रात पहिला प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवृत्तीवर विचारला आहे. लालकृष्ण आडवाणी यांना 75 व्या वर्षानंतर निवृत्त केल्याच्या उदाहरणाचा उल्लेख करून, त्यांनी भागवतांना विचारले की, “आडवाणींवर लागू झालेला निवृत्तीचा नियम मोदींवर लागू होणार नाही का?”

ईडी-सीबीआयचा वापर आणि भ्रष्टाचाराचा आरोप-

दुसरा प्रश्न विचारताना केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केलेल्या नेत्यांवर काहीच काळानंतर भाजपसोबत सरकार बनवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. “भ्रष्टाचारी नेत्यांवर आरोप लावून काही दिवसांनंतर त्यांना भाजपमध्ये सामील करून घेणे, हे काय तुम्हाला किंवा आरएसएसला मान्य आहे?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

भारतीय लोकशाही आणि राष्ट्रीय ध्वजाचा गौरव

केजरीवाल यांनी आपल्या पत्रामध्ये भारतीय लोकशाही आणि तिरंग्याचा मान राखण्याची महत्त्वाची जबाबदारी आपली असल्याचे म्हटले आहे. “भारताचे तिरंगा गर्वाने आकाशात लहरावे, हे सुनिश्चित करणे आपल्यासारख्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे,” असे केजरीवाल म्हणाले.

ईडी-सीबीआयचा वापर-

तिसऱ्या मुद्द्यावर केजरीवाल यांनी भागवत यांना विचारले आहे की, “ईडी-सीबीआयचा वापर करून, सरकारे पाडणे आणि विरोधकांना दबावाखाली आणणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोन आहे का?” त्यांनी म्हटले आहे की, भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात हे प्रश्न आहेत.

भाजपचा पथभ्रष्ट मार्ग

केजरीवाल यांनी पुढे विचारले की, “भाजप जे पथभ्रष्ट कार्य करत आहे, त्याबाबत आपण कधीही पंतप्रधानांना रोखले का? भाजपचा मार्ग चुकीचा असल्यास आरएसएसची जबाबदारी आहे की त्यांना योग्य मार्गावर आणावे.”

पत्राला उत्तराची अपेक्षा-

अखेर, केजरीवाल यांनी आशा व्यक्त केली आहे की मोहन भागवत या पत्राला उत्तर देतील. ते म्हणाले की, “मी तुम्हाला हे पत्र सामान्य नागरिक म्हणून लिहीत आहे आणि मला आशा आहे की तुम्ही या प्रश्नांना उत्तर द्याल.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकार म्हणजे 'देशी ब्रिटिश', असिम सरोदेंच्या निलंबनावरून ठाकरे गट आक्रमक....

Kartik Purnima 2025: दिवे दान केल्याने माता लक्ष्मी अन् भगवान विष्णू कसे प्रसन्न होतात? जाणून घेऊया सविस्तरपणे

Mirabai Chanu : मीराबाई चानूचा ऑलिंपिक मार्ग खडतर; ४९ किलो वजनी गटाला कात्री, आता ५३ किलोत खेळावे लागणार

Ahilyanagar fraud: नफ्याच्‍या आमिषाने तीन कोटींची फसवणूक; शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नडली, अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढचे 5 दिवस पावसाचे, अनेक जिल्ह्यांना इशारा

SCROLL FOR NEXT