Arvind Kejriwal and Narendra Modi News Arvind Kejriwal and Narendra Modi News
देश

मला सिंगापूरला जाऊ द्या, मुख्यमंत्री केजरीवाल यांचं पंतप्रधानांना पत्र

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहून सिंगापूरला (Singapore Tour) जाण्याची परवानगी रोखणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखणे हे देशहिताच्या विरोधात आहे. तेव्हा लवकरात लवकर परवानगी द्या. कार्यक्रमात जाऊन देशाचे नाव मोठे करता येईल, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. (Arvind Kejriwal and Narendra Modi News)

‘सिंगापूर (Singapore) सरकारने जागतिक दर्जाच्या परिषदेत दिल्ली मॉडेल सादर करण्यासाठी आमंत्रित केले आहे. दिल्लीचे मॉडेल जगभरातील अनेक मोठ्या नेत्यांसमोर मांडले जाणार आहे. आज जगाला दिल्ली मॉडेलबद्दल जाणून घ्यायचे आहे. हे निमंत्रण देशासाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे’ असे पत्रात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी लिहिले आहे.

‘प्रोटोकॉल’नुसार, मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्याला अधिकृत परदेश दौऱ्यासाठी गृहमंत्रालयाची परवानगी घ्यावी लागते. मंजुरीची फाईल लेफ्टनंट गव्हर्नर कार्यालयामार्फत गृह मंत्रालयाकडे पाठवली जाते. दिल्ली सरकारच्या अनेक महत्त्वाच्या फायलींना उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी मंजुरी दिलेली नाही. यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सिंगापूर दौऱ्याच्या फायलीचाही समावेश आहे, असे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

दिल्लीशी संबंधित लहानमोठ्या बाबी दीर्घकाळ प्रलंबित ठेवल्या जात आहेत. ज्यामुळे सार्वजनिक कामांना विलंब होत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सिंगापूर येथे होणाऱ्या वर्ल्ड सिटी कॉन्फरन्सला दिल्लीतील प्रशासनाचे मॉडेल सादर करण्यासाठी जाणार आहे. मात्र, उपराज्यपालांनी अद्याप फाईल मंजूर केलेली नाही, असे एका सूत्राने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT