Arvind Kejriwal  esakal
देश

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

''ज्या पुराव्यांच्या आधारावर केजरीवालांना अटक केली आहे, ते सगळे पुरावे २०२३च्या पूर्वीचे आहेत. प्रत्येक पुरावा जुलै २०२३ सारखा आहे. मनीष सिसोदिया यांच्या प्रकरणातही हेच पुरावे आधार बनले होते.. मनी ट्रेल चार्ट तोच होता.''

संतोष कानडे

Arvind Kejriwal AAP News : सुप्रीम कोर्टामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. केजरीवालांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर झालेल्या सुनावणीमध्ये वकील अभिषेक मनुसिंघवी यांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले.

यापूर्वी ३० एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने अटकेच्या वेळेसंबंधात प्रश्न उपस्थित करत ईडीकडे उत्तर मागवलं होतं. यासोबतच इतरही मुद्द्यांवर उत्तरं मागवले होते. जस्टिस संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या बेंचसमोर या प्रकरणी सुनावणी झाली.

सुनावणीदरम्यान अभिषेक मनुसिंघवी यांनी केजरीवाल यांची बाजू मांडत म्हटलं की, आम्ही सहकारी आहोत. आरोपी किंवा दोषी नाहीत. शेवटचं समन्स १६ मार्च २०२४ रोजी आलं होतं. त्यात आम्हाला २१ मार्च रोजी हजर राहण्यास सांगण्यात आलेलं होतं. यावरुन हे स्पष्ट होतंय की, १६ मार्चपर्यंत आम्ही आरोपी नाहीत. मग अचानक असं काय बदललं?

यावर जस्टिस खन्ना म्हणाले की, जोपर्यंत तुम्ही अटक होत नाहीत तोपर्यंत तुम्ही आरोपी नाहीत. तर सिंघवी म्हणाले, केजरीवाल यांनी लिखित स्वरुपात विचारलं होतं की, ते आरोपी आहेत का? ईडीच्या म्हणण्यानुसार ते १६ मार्चपर्यंत आरोप नव्हते. मग २१ मार्चला ते अचानक कोर्टात असं कसं म्हणू शकतात की केजरीवालांना अटक करणं आवश्यक होतं?

सिंघवी पुढे म्हणाले की, ज्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर केजरीवालांना अटक केली आहे, ते सगळे पुरावे २०२३च्या पूर्वीचे आहेत. प्रत्येक पुरावा जुलै २०२३ सारखा आहे. मनीष सिसोदिया यांच्या प्रकरणातही हेच पुरावे आधार बनले होते.. मनी ट्रेल चार्ट तोच होता.

सिंघवींनी युक्तिवादारम्यान म्हटलं की, सेक्शन ७० पीएमएलए.. कोणत्याही राजकीय पक्षाद्वारे केलेल्या कोणत्याही कामासंबंधी त्याच्या अध्यक्षांना किंवा संयोजकांना जबाबदार धरण्यात येणार नाही. त्यावर कोर्टाने म्हटलं की, तुम्ही चुकताय. कोणताही व्यक्ती तो कंपनीचा प्रभारी असेल आणि कंपनी जर कोणताही गु्न्हा करत असेल तर कंपनीसोबत तो प्रभारीसुद्धा जबाबदार आहे.

त्यावर सिंघवी म्हणतात, ईडीच्या म्हणण्यानुसार पूर्ण संपूर्ण प्रकरणामागे केजरीवाल यांचं डोकं आहे. ते लाचेच्या मागणीत सहभागी आहेत. परंतु यासंदर्भातचे थेट पुरावे काहही नाहीत. असं म्हणत त्यांनी सिसोदियांच्या प्रकरणातले पुरावे आणि केजरीवाल यांच्या प्रकरणातले पुरावे सारखेच असल्याचं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT