arvind kejriwal esakal
देश

Delhi Liquor Policy : उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अरविंद केजरीवाल यांची सुप्रीम कोर्टात धाव

''केजरीवाल हे वैयक्तिकरीत्या आणि आम आदमी पक्षाचे समन्वयक म्हणून या गैरव्यवहारात सामील असल्याचे दिसून येते. केजरीवाल साक्षीदारांचा जबाब नाकारू शकत नाहीत, पण ते त्यांची उलटतपासणी करू शकतात.''

संतोष कानडे

Arvind Kejriwal Arrest : मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला होता. या निर्णयाविरोधात केजरीवाल यांनी आता सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. अरविंद केजरीवाल यांचे वकील बुधावारी सकाळी सुनावणी होण्यासाठी विनंती करणार आहेत.

केजरीवाल हे वैयक्तिकरीत्या आणि आम आदमी पक्षाचे समन्वयक म्हणून या गैरव्यवहारात सामील असल्याचे दिसून येते. केजरीवाल साक्षीदारांचा जबाब नाकारू शकत नाहीत, पण ते त्यांची उलटतपासणी करू शकतात. अर्थात हे उच्च न्यायालयात नव्हे तर कनिष्ठ न्यायालयात होऊ शकते,’’ असेही न्या. शर्मा यांनी मंगळवारी म्हटले.

कोर्टाने म्हटलं की, ईडीचं म्हणणं आहे की, आतापर्यंतच्या पुराव्यांवरुन गोवा निवडणुकीत ४५ कोटी रुपये खर्च केले गेले. केजरीवाल हे पक्षाचे संयोजक आहेत. यानंतर केजरीवालांच्या वकिलांनी याचा विरोध केला. त्यांनी शरथ रेड्डी आणि राघव मुंगटा यांच्या विधानाचा उल्लेख केला. त्यावर कोर्टाने म्हटलं की, सरकारी साक्षीदार ठरवण्याचा निर्णय कोर्ट करतं, तपास यंत्रणा ते ठरवत नाही.

कायदे शंभर वर्षे जुने

‘पुराव्यासंदर्भातील कायदे एक वर्षापासून नव्हे तर शंभर वर्षांपेक्षा जास्त जुने आहेत. याचिकाकर्त्याला फसविण्यासाठी ते बनविण्यात आल्याचे म्हटले जाऊ शकत नाही. त्याचवेळी केजरीवाल यांनी त्यांना मागितलेली कागदपत्रे दिली पाहिजेत,’’ असे उच्च न्यायालयाने सांगितले. राघव मगुंटा आणि त्याच्या वडिलांनी भाजपला पैसे दिल्याचा दावा केजरीवाल यांनी केला होता. त्यावर निवडणूक लढविण्यासाठी कोण कोणाला किती पैसा देतो? हे पाहणे न्यायालयाचे काम नाही, असा शेरा न्यायालयाने मारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

Heritage sites: बाघ गुंफांच्या भित्तीचित्रांपासून गिन्नौरगडच्या किल्ल्यापर्यंत; चार स्थळांना UNESCOची दखल

Latest Marathi News Live Update : ST बँक कथित घोटाळा प्रकरणात मोठी घडामोड; बड्या व्यक्तींवर कारवाईची शक्यता?

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

SCROLL FOR NEXT