woman asked cm arvind kejriwal  sakal
देश

Arvind Kejriwal: सिसोदियांच्या पत्रावर केजरीवालांची टोकदार प्रतिक्रिया; म्हणाले, मोदींना विज्ञानाची...

सिसोदियांचं समर्थन करताना भारताच्या विकासासाठी शिकलेला पंतप्रधान असणं गरजेचं

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवी प्रमाणपत्रावरुन निर्माण झालेला वाद अद्यापही शमण्याचं नाव घेत नाहीए. यावर आता दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी देशवासियांच्या नावानं पत्र लिहून हा विषय पुन्हा चर्चेत आणला आहे. त्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. (Arvind Kejriwal sharp reaction to Manish Sisodia letter to people of India)

केजरीवाल म्हणाले, मनिष सिसोदिया यांनी तुरुंगातून देशाच्या नावे पत्र लिहिलं असून यामध्ये पंतप्रधानांचं शिक्षण कमी असणं हे देशासाठी खूपच घातक असल्याचं म्हटलं आहे. मोदींना विज्ञान कळत नाहीत. मोदींना शिक्षणाचं महत्व कळत नाही. गेल्या काही वर्षात ६०,००० शाळा त्यांनी बंद केल्या आहेत. त्यामुळं भारताच्या विकासासाठी पंतप्रधानांचं उच्चशिक्षित असणं गरजेचं आहे.

सिसोदियांनी पत्रात काय म्हटलंय?

आज आपण २१ व्या शतकात जगतोय, जगभरात विज्ञान आणि टेक्नॉलॉजीमध्ये प्रत्येक दिवशी अपडेट होत आहे. संपूर्ण जग आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची (AI) चर्चा करत आहे. या काळात जेव्हा पंतप्रधान नाल्याच्या पाईपमधील गॅसचा वापर करता यायला हवा, ढगांच्या पलिकडील विमान रडारवर दिसत नाही अशा दाव्यांमुळं संपूर्ण जग त्यांच्यावर हसत आहे. शाळा-कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी त्यांची खिल्ली उडवतात. त्यांचे अशा प्रकारची विधानं देशासाठी घातक आहेत. याचे अनेक नुकसान आहेत. यामुळं जगाला कळतं की भारताच्या पंतप्रधानांचं शिक्षण किती कमी आहे. पंतप्रधान कमी शिक्षित असणे देशासाठी धोकादायक आहे. मोदींना शिक्षणाचे महत्त्व समजत नाही, त्यांनी गेल्या काही वर्षांत देशभरातील 60,000 शाळा बंद केल्या आहेत, अशा अनेक बाबी सिसोदियांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

हे ही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

दिल्लीच्या कथित 'मद्य धोरण घोटाळ्यात' सिसोदिया सध्या तिहार तुरुंगात आहेत. तुरुंगातूनच त्यांनी पंतप्रधानांच्या शिक्षणावरुन जनतेला पत्र लिहिलं आहे. यापूर्वी त्यांनी तुरुंगातून होळीच्या दिवशी एक ट्विट केलं होतं त्यामुळं त्यांच्याकडे तुरुंगात मोबाईल कसा? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT