Arvind Kejriwal Sakal
देश

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांना पुन्हा समन्स, गुरुवारी चौकशीला बोलावलं

बहुचर्चित मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा समन्स बजावले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : बहुचर्चित मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा समन्स बजावले आहे. चौकशीसाठी येत्या २१ तारखेला हजर राहावे, असे या समन्समध्ये म्हटले आहे.

ईडीने याआधीही केजरीवाल यांना नोटीस बजावत २ नोव्हेंबरला हजर राहण्यास सांगितले होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र असल्याने हजर राहू शकत नाही, असे केजरीवाल यांनी ईडीला कळविले होते.

विशेष म्हणजे गेल्या फेब्रुवारी महिन्यात सीबीआयने केजरीवाल यांची चौकशी केली होती. मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी ईडीने जे आरोपपत्र दाखल केले आहे, त्यात अनेक ठिकाणी केजरीवाल यांच्या नावाचा उल्लेख आहे.

बेकायदेशीररित्या पैसा कमावण्यासाठी जाणीवपूर्वक त्रुटी ठेवून आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीचे उत्पादन शुल्क धोरण बनविले होते, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आलेले आहे. या प्रकरणातील आरोपींची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती, असेही आरोपपत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT