Arvind Kejriwal Sakal
देश

Delhi: प्रदूषण रोखण्यासाठी केजरीवालांचा दहा कलमी कार्यक्रम

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील हिवाळ्यातील प्रदूषणावर मात करण्यासाठी केजरीवाल सरकारने फटाक्यांवर बंदीबरोबरच दहा कलमी कार्यक्रम आखला आहे. त्यानुसार कचरा जाळणे, धूळ आणि वाहनांच्या धुराची तपासणी जाणार आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याबाबत म्हणाले की, पंधरा सप्टेंबरपासून आतापर्यंत दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती बरी आहे. पण आता शेजारील राज्यांतील शेतकऱ्यांना शेतातील गवत आणि आधीच्या पिकांचे अवशेष जाळावे लागतील. त्यामुळे काही दिवसांत दिल्लीत प्रदूषण जाणवेल. त्यासाठी सरकारी यंत्रणेला हवा स्वच्छ करण्यासाठी सूचना केली आहे. धुळीचे प्रदूषण तपासण्यासाठी बांधकाम स्थळांची पाहणी करण्यासाठी ७५ गट आणि शहरातील प्रदूषण हॉटस्पॉटवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष गटाची स्थापना केली आहे. वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी ६४ रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठीही पावले उचलली जातील. वाहनांची तपासणी करण्यासाठी ५०० पथके तयार करून प्रदूषण नियंत्रण (पीयूसी) काटेकोरपणे पाळले जाईल. शहरातील कचरा जाळणे थांबवण्यासाठी एकूण २५० गट तयार करण्यात आले आहेत. तसेच, ग्रीन वॉर रूम मजबूत करणे आणि जनजागृती अभियान हिवाळी कृती योजनेचा भाग असेल," असे त्यांनी सांगितले.

स्मॉग टॉवरच्या परिणामांचा अभ्यास

दिल्लीप्रमाणे राष्ट्रीय राजधानी (एनसीआर) क्षेत्रांना सीएनजीवर चालणारी वाहने, थर्मल प्लांट्स आणि इतर उद्योगांमध्ये स्वच्छ इंधनाचा वापर, हॉटस्पॉट्सचे निरीक्षण आणि वापर थांबवण्यासाठी चोवीस तास वीज पुरवठा केला जाईल. आम्ही दिल्लीत श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजना लागू केली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी आम्ही प्रदूषण विरोधी कारवाईचा भाग म्हणून ७५ गटांची स्थापना केली आहे. आम्ही दिल्लीच्या स्मॉग टॉवरच्या परिणामाचाही अभ्यास करत आहोत आणि परिणाम चांगले असतील तर आणखी टॉवर बसवले जातील, असे ते म्हणाले. दिल्लीमध्ये २० एकरांवर पसरलेले देशातील पहिले इको-वेस्ट पार्क देखील बांधत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nobel Prize 2025 : क्वांटम संशोधनाला सलाम! जगाला आश्चर्यकारक फायदा; तीन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर

Gold Crash: सोन्याचा फुगा लवकरच फुटणार; भाव 77,700 रुपयांवर येणार, तज्ञांचा धक्कादायक इशारा

Indian Air Force Day 2025: किती शक्तीशाली आहे भारतीय वायुसेना, 'या' दहा मुद्द्यांद्वारे जाणून घ्या

INDU19 vs AUSU19 : ५-०! जे सिनियर्सना नाही जमलं, ते ज्युनियर्सनी केलं; ऑस्ट्रेलियाला घरात घुसून लोळवलं, रचला इतिहास

Maratha Reservation : 1994 च्या 'जीआर'ला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार; मनोज जरांगेंचा महत्त्वाचा निर्णय, ओबीसी नेत्यांसह काँग्रेसला दिला इशारा

SCROLL FOR NEXT