Shiv Sena (UBT) MP Arvind Sawant speaks in Lok Sabha, strongly criticizing Prime Minister Narendra Modi over the Pahalgam ceasefire announcement and its implications for national security.  esakal
देश

Arvind Sawant Criticism PM Modi : ''...तर आम्ही मोदींना डोक्यावर घेवून नाचलो असतो'' ; अरविंद सावंतांचं लोकसभेत मोठं विधान!

Arvind Sawant in Lok Sabha over Pahalgam ceasefire : बिनशर्त युद्धसमाप्तीची घोषणा का केली? एकही देश भारतासोबत का उभा राहिला नाही? असे सवालही केले.

Mayur Ratnaparkhe

Arvind Sawant’s Attack on PM Modi in Lok Sabha :लोकसभेत आज(सोमवार) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धात अचानक मध्येच युद्धसमाप्तीची घोषणा केली गेल्याचा पार्श्वभूनीवर  पंतप्रधान मोदींसह केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.  अरविंद सावंत पंतप्रधान मोदींवर टीका करताना म्हणाले, ‘’तुम्ही बिहारमध्ये गेलात, पण पहलगामला गेला नाहीत. अरे आजपर्यंत तर तुमन्ही मणिपूरलाही गेलेली नाहीत. तुम्हाला काहीच वाईट दु:ख वाटत नाही, तरीही आम्ही तुमचा ढोल बडवायचा का? आम्ही ढोल सैन्याचा वाजवू, तुमचा नाही वाजवणार. तुमचं काय त्यात शौर्य होतं?’’

तसेच, जर तुम्ही सैन्याला स्वातंत्र्य दिलं होतं, तर स्वातंत्र्य दिल्यानंतर आणि तुमचे संरक्षण विभागाचे अधिकारी सांगतात की पाकिस्तानचे अधिकारी पायापडत होते, तर मग तुम्ही बिनाशर्त युद्ध समाप्त केलं? त्या अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षाची बडबड तर  आजही सुरूच आहे, मीच युद्ध रोखलं, मीच युद्ध रोखलं. पण बिनशर्त का युद्ध रोखलं? जर ते रडत होते तर अट घालयला हवी होती, ते शरणजरी येत होते तरी अटी घालयला हव्या होत्या. काय अटी घातल्या तुम्ही?  त्यानंतरही युद्ध सुरूच होतं. आपल्या जम्मूवर हल्ले सुरू होते. नागरिकांच्या वस्त्यांवर हल्ले होत राहिले, आम्ही पाहात रहावं का?’’ असा सवाल सावंतांनी केला.

याचबरोबर  ‘’आधी तर फार म्हणायचे आम्ही पाकव्याप्त काश्मीर घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. तर आता संधी आली होती, तेव्हा तुम्हाला कोणी रोखलं होतं. आता तुम्ही म्हणातय आम्हाला युद्ध नको बुद्ध हवाय.. तुम्ही जर सैन्याला स्वातंत्र्य दिलं होतं, तर रोखलं का? हीच संधी होती पाकिस्तानला धडा शिकवण्याची, जसा इंदिरा गांधींनी शिकवला होता. पाकव्याप्त काश्मीर जर ताब्यात घेतला असता तर आम्ही पंतप्रधान मोदींना डोक्यावर घेवून नाचलो असतो. तुम्ही जे म्हणताय ना घुस के मारेंगे.. तर ओसामा बिन लादेनला जसं मारलं गेलं ना त्याला म्हणतात घुसून मारणं. जो पाकिस्तान तुमच्यासोबत अशाप्रकारे वागतो, त्या पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणं बंद करा.’’ असंही यावेळी अरविंद सावंत म्हणाले.

याशिवाय, आपल्याबाबत सर्वात मोठी वाईट गोष्ट ही आहे की,  आपल्या आसापासचं एकही राष्ट्र आपल्याशी बोलत नाही. आपण तर विश्वगुरू आहोत, संपूर्ण जगात फिरतोय २०० देशांमध्ये गेलो. दहशतवादाबाबत आपण बोलतो, पाकिस्तानच्या दहशतवादाच्या मुद्य्यावर आपण तडजोड करत नाहीत, केलीच नाही पाहीजे. त्याबद्दल मी मोदींना धन्यवादही देतो. पण माननीय पंतप्रधान महोदय आपल्या बाजूने संपूर्ण जगात एकही राष्ट्र उभा राहिले नाही.  आम्ही केवळ टीका टिप्पणीसाठी इथे उभा नाही आहोत, पण एकही देश आपल्यासोबत उभा राहिलेला  नाही. तो इस्रायल उभा राहिला आणि आपण इराणच्या विरोधात उभा राहिलो, जो इराण आपल्याला तेल देतो, पैसे नंतर दिले तरी चालेल तेल घ्या म्हणतो. त्या इराणसोबतचे संबंधही बिघडले, हे आहे आपले पराष्ट्र धोरणं. असं म्हणत अरविंद सावंत यांनी टीकास्त्र सोडलं.

तसेच, ही केळव पहलगामची गोष्ट नाही, तर कारगिलमध्येही आपण ऑपरेशन विजय केलं होतं. त्यानंतही गलवान, डोकलाम होत राहिलं. सीमेवर घुसखोरी सुरूच आहे. चीन घुसखोरी करतोय. कोणी कोणी या युद्धात पाकिस्तानला मदत केली? चीन तर मदत करतच होता, तुर्कीपण करत होता ड्रोन देत होता. तिन्ही देश मिळून हे करत होते. आपल्याला अंतर्मूख होवून आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे, की एकही देश आपल्यासोबत  का उभा राहत नाही. आम्ही काय चुकीचं केलं आहे? आंतरराष्ट्रीय नाणे निधीनेही युद्धाच्या वेळीच पैसे दिले. असंही यावेळी अरविंद सावंत यांनी बोलून दाखवलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT