devendra fadanvis 
देश

देवेंद्र फडणवीसांचा विक्रम तरुणीने मोडला; 21 व्या वर्षी झाली सर्वात तरुण महापौर!

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिली- देशातील सर्वांत तरुण महापौर अशा विक्रमाची नोंद महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर होती. पण, त्यांचा हा विक्रम आता मोडीत निघाला आहे. कारण देशातील तरुण महापौर म्हणून आता केरळच्या एक तरुणीला ओळखले जाणार आहे. देवेंद्र फडणवीस वयाच्या 21 व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर म्हणून निवडून आले होते. आता केरळच्या एका तरुणीने 21 व्या वर्षीच महापौर होण्याचा विक्रम केला आहे. 

कोरोना लसीकरणाची तयारी पूर्ण आहे का? 4 राज्यात होणार रंगीत तालीम

केरळची राजधानी तिरुवनंतपुरम या शहराच्या महापालिकेच्या महापौर म्हणून आर्या राजेंद्रन यांची निवड झाली आहे. आर्या राजेंद्रन या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्य आहेत. त्या देशातील सर्वात तरुण महापौर ठरल्या आहेत. विशेष म्हणजे त्या तिरुवनंतपुरमच्या LBS कॉलेजमध्ये इंजिनीअरिंगच्या पदवीसाठी अभ्यास करत आहेत. पण त्या पदवी घेण्याआधीच शहराच्या महापौरपदी विराजमान झाल्या आहेत.

स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेत आर्या राजेंद्रन कार्यरत आहेत. त्या SFI च्या पदाधिकारी आहेत. महापालिकेची निवडणूक आर्या यांनी पहिल्यांदाच लढवली. CPIM च्या जिल्हा सचिवालयानेच त्यांच्या नावाची शिफारस केली होती. अगदी लहान वयात त्या महापौर सारख्या महत्वाच्या पदावर विराजमान झाल्या आहेत. याआधी त्यांना नगरसेवक होण्याची संधी मिळाली होती. 

कोरोना विषाणूचा नवा प्रकार जास्त घातक; मृतांची संख्या वाढणार?

देवेंद्र फडणवीस 1997 मध्ये महाराष्ट्रातील नागपूर महापालिकेचे महापौर म्हणून निवडून आले होते. फडणवीस यांचे वय त्यावेळी 21 वर्षं होते. त्याअगोदर आर्या राजेंद्रन यांच्याप्रमाणेच वयाच्या 21 व्या वर्षी ते नागपूर महापालिकेची निवडणूक जिंकून नगरसेवक झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT