crime news sakal
देश

हुंड्यात म्हैस न मिळाल्याने पतीचा राग अनावर; केली पत्नीची हत्या

घटनेनंतर आरोपी दरोगा सिंग घर सोडून फरार झाला.

सकाळ डिजिटल टीम

देशात जरी हुंडाबंदी असली तरी भारतीय समाजव्यवस्थेत गैर प्रकाराने हुंडा घेतला जातो. हुंड्यात सहसा पैशांची मागणी केली जाते. मात्र बिहारच्या (Bihar) पूर्व चंपारण (Champaran) जिल्ह्यातील खरुहा गावात हुंड्यात म्हैस न मिळाल्याने पतीने चक्क पत्नीची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमृता कुमारी असे मृत महिलेचे नाव आहे. (as buffalo not found in dowry, husband killed his wife in bihar)

खरुहा येथील रहिवासी बैद्यनाथ सिंह यांचा मुलगा दरोगा सिंग याच्याशी 2018 साली अमृताचे लग्न झाले होते. यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. हुंडाच्या लालसेपोटी म्हैस न मिळाल्याच्या रागातून दरोगा सिंग याने पत्नीचा चाकूने वार करून तीची हत्या केली. त्याने चाकूने मानेवर व पोटावर वार केले. घटनेनंतर आरोपी दरोगा सिंग घर सोडून फरार झाला.

घटनेची माहिती मिळताच कुंडवा चैनपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले आरोपी विरोधात एफआयआर नोंदवला असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel Conflict : तेहरान अंधारात ! इस्रायली हल्ल्यानंतर इराणमध्ये वीजपुरवठा ठप्प, मध्यपूर्वेत तणाव शिगेला

Nagpur News: क्रीडा-सांस्कृतिक महोत्सवासाठी जि.प. कडून २० लाखांची तरतूद

Shikhar Shinganapur Yatra: कावडींचा आज मुंगी घाटात थरार! काळगावडे राजेंनी घेतले शंभू महादेवाचे दर्शन, शिखर शिंगणापूर यात्रेत उत्साह..

Sangli Crime : सांगली हादरली! जुन्या वादाचा भयानक शेवट; वाळव्यातील तरुणाचा दगडाने डोके ठेचून निर्घृण खून

Nagpur News: दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या बदलीनंतर सेवाज्येष्ठतेत बदल नाही; उच्च न्यायालय ; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याला दिलासा नाकारला

SCROLL FOR NEXT