mucor-mycosis  File Photo
देश

म्युकरमायकोसिस महामारी घोषीत; राजस्थान सरकारचा मोठा निर्णय

या आजारानं देशात वेगानं हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

जयपूर : म्युकरमायकोसिस (mucormycosis) या आजारानं देशात वेगानं हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. अत्यंत महागडे उपचार आणि जीवघेण्या असलेल्या या आजारानं देशासमोर आता नवं संकट उभा केलं आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan) या आजाराचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असल्यानं इथल्या गेहलोत सरकारनं (Gehalot Government) ब्लॅक फंगस अर्थात म्युकरमायकोसिस या आजाराला महामारी म्हणून घोषीत केलं आहे. (as cases of mucormycosis rise Black Fungus declared epidemic in Rajasthan)

म्युकरमायकोसिस अथवा ब्लॅक फंगस हा दुर्मिळ असा बुरशीयुक्त संसर्गजन्य आजार आहे. ही बुरशी पर्यावरणात जिवंत राहते त्यामुळे त्याचा सायनस आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो. या आजाराचा संसर्ग झाल्यानंतर डोळे लाल होणे आणि दुखणे, ताप येणे, खोकला, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होणं, दृष्टी अस्पष्ट होणं, उलटी झाल्यास रक्त पडणं तसेच मानसिक चलबिचलता वाढणे ही याची लक्षणं आहेत. सध्याच्या कोरोनाच्या काळात या आजारानं डोकं वर काढलं आहे. कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये काही विशिष्ट औषधांमुळे बुरशीचा संसर्ग होत असल्याचं सिद्ध झालं आहे. सध्या हा आजार वेगानं पसरत असल्याचं दिसून येत आहे.

अधिक स्टेरॉईड दिल्यानं ब्लॅक फंगसचा धोका - डॉ. गुलेरिया

कोरोनाच्या आजारातून बरं झाल्यानंतर किंवा कोरोनावर उपचार सुरु असताना रुग्णाला ब्लॅक फंगसचा संसर्ग होताना दिसून आलं आहे. या आजाराचा संसर्ग झालेल्या अनेक रुग्णांचा मृत्यूही झाल्याच्या घटना देशात घडल्या आहेत. या आजारावर स्पष्टीकरण देताना एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी नुकतचं म्हटलं होतं की, सर्वसाधारणपणे कोरोनाच्या रुग्णांना पाच ते दहा दिवसांसाठीच स्टेरॉईडची गरज पडते. यानंतर जास्त काळासाठी रुग्णांना स्टेरॉईड दिलं गेलं तर त्याला ब्लॅक फंगसचा (म्युकरमायकोसिस) संसर्ग होण्याची शक्यता बळावते. रुग्णांना स्टेरॉईड दिलं जात असेल तर त्यांचं पूर्ण निरिक्षण करणं आरोग्य कर्मचाऱ्यांची जबाबदारी आहे. या आजारापासून वाचण्यासाठी रुग्णाला वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरिक्षणाची मोठी गरज आहे.

या राज्यांमध्ये वेगानं पसरतोय नवा आजार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान म्युकरमायकोसिसच्या प्रकरणात वाढ झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, दिल्ली आणि कर्नाटकशिवाय इतर काही राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसची प्रकरणं वेगानं वाढत आहेत. तर हरयाणा सरकारनं ब्लॅक फंगसला नोटिफाईड डिसीज (अधिसूचित आजार) म्हणून घोषीत केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Land Scam: सरकारी जमिनीवर माफियांचा डोळा! पुण्यात कृषी विभागाच्या जमिनीचा मोठा अपहार; अधिकारीही अडचणीत

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या घातपाताचा कट उघड; जालन्यात अमोल खुणे, दादा गरुड यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल

बाथरुमचा पाइप डायरेक्ट समुद्रात... वनिताच्या घरात घुसलेलं २६जुलैच्या पुराचं पाणी; म्हणाली, 'शाळेत जायला निघालेलो आणि...

Eknath Shinde Vs BJP : कोकणात एकनाथ शिंदे स्वबळावर लढणार, दीपक केसरकरांनी भाजपला इशारा देत विजयाचं गणित सांगितलं...

Malkapur Accident : 'ट्रकच्या धडकेत तिघे गंभीर जखमी'; मलकापूरनजीक अपघात, दोन महामार्ग कर्मचाऱ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT