Aurangabad
Aurangabad esakal
देश

Aurangabad : घागर नळाला लावताच पाणी गायब! संतप्त महिलांची महापालिकेत धाव

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा सुरू होताच शहरात पाण्याची मागणी वाढली असून, अनेक भागात महापालिकेचे पाणी पोचत नसल्याने आंदोलने सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वी एमआयएम पक्षातर्फे महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर गुरुवारी (ता. १४) जयभीमनगर भागात नळाला तब्बल १४ व्या दिवशी फक्त १० मिनीट नळाला पाणी आल्याने महापालिका मुख्यालयात धाव घेऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला; तसेच म्हाडा कॉलनीतील महिलांनी हंडामोर्चा काढला.

उन्हाळा सुरू होताच शहरातील नागरिकांवर पाणी पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेत वारंवार तांत्रिक बिघाड येत आहेत, तर अधून-मधून पाइपलाइन फुटत आहे. त्यामुळे शहरातील पाण्याचे वेळापत्र कोलमडले आहे. अनेक भागात आठ दहा दिवसांनंतर पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. गुरुवारी घाटी परिसरातील जयभीमनगर भागात तब्बल १४ दिवसांनंतर नळाला पाणी आले. पण फक्त १० मिनिटांत पाणी गेले, असा आरोप करत अनेक महिला महापालिकेत दाखल झाल्या. त्यांनी शहर अभियंत्याच्या दालनासमोर अधिकाऱ्याला गाठून जाब विचारला. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के. एम. फालकही आले. त्यांनी महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण नळाला पुन्हा पाणी सोडल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही, असा पवित्रा घेत महिलांनी ठिय्या मांडला. तीन-चार गल्ल्यांना पाण्याचा नेहमीचा त्रास आहे. वारंवार तक्रारी करूनदेखील संबंधित लाइनमन दखल घेत नसल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला. पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर महिलांनी माघार घेतली.

म्हाडा कॉलनीत हंडा मोर्चा

महिनाभरापासून म्हाडा कॉलनी परिसरात नळांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. गेल्या वीस दिवसांपासून म्हाडा कॉलनीत पाणी आले नसल्याने या भागातील संतप्त महिलांनी सकाळी ११.३० वाजता थेट म्हाडा कार्यालयावरच हंडामोर्चा काढला. महिलांनी रिकामे भांडे वाजवून घोषणाबाजी केली. प्रशासनाने त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करावा. पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर महापालिका प्रशासकांच्या दालनात ठिय्या मांडू, असा इशारा या महिलांनी दिला. सारिका जोशी, निर्मला शेलार, चंद्रशेखर वर्मा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे चक्क सिझेरियन पुढे ढकलावे लागत आहेत, अशी धक्कादायक बाब समोर आली. यामुळे बाळ आणि आई दोघांच्याही जिवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरात अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे नेहमी पाहायला मिळते. परंतु, आता चक्क घाटी रुग्णालयातील प्रसूती विभागालाही अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा फटका बसत असल्याचा प्रकार समोर आला. घाटीतील प्रसूती विभाग हा सामान्य प्रसूतीवर भर देत असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल होतात. काही वेळा बाळ आणि आईच्या सुरक्षिततेसाठी सिझेरियन करावे लागते. मागील वर्षभरात घाटीमध्ये १९ हजारांपेक्षा जास्त प्रसूती झाल्या आहेत. यात सिझेरियन करण्याचे प्रमाण २२ टक्के होते. म्हणजेच दिवसभरात दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी २२ टक्के रुग्णांत सिझेरियन करावे लागते. मागील दोन दिवसांपासून पाणीपुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने सिझेरियन करताना अडचणी येत आहेत. यामुळे सिझेरियन पुढे ढकलण्याची वेळ येत आहे.

केवळ पाण्याचा प्रवाह कमी होता. त्यामुळे सिस्टर घाबरल्या होत्या. पाणी बंद नव्हते. एक ते दीड तासातच महापालिकेचे पाणी सुरू झाले. त्यामुळे सिझेरियन बंद नव्हते. बुधवारी १७ तर गुरुवारी ८ सिझेरियन करण्यात आले. गुरुवारी पाइपलाइनही टाकण्यात आली. यामुळे समस्या मिटली आहे.

— डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभाग प्रमुख, प्रसूती विभाग

पाण्याअभावी बुधवारी लासूर येथून आलेल्या महिलेचे सिझेरियन गुरुवारी करण्यात आले. अशी दुर्दैवी वेळ घाटी प्रशासनावर आली. परंतु, अशा प्रकारामुळे आई आणि बाळ दोघांच्याही सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होतो. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास शस्त्रक्रियागृहात आम्ही गेलो तेव्हादेखील पाणी नसल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे येथील नवीन बसवलेल्या एसीमधूनही पाणी गळती होत असल्याचे दिसले.

— प्रवीण शिंदे, अभ्यागत समिती सदस्य, घाटी रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT