Asaduddin Owaisi News esakal
देश

तुम्हाला आमचे दुःख समजत नाही, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींवर टीका

'तुम्हाला आमचे दुःख समजत नाही'

सकाळ डिजिटल टीम

हा जो तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, त्यांच्या तोंडातही दही जमा झाली होती. फक्त आम्हीच बोलत होतो. तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष काल रात्री अचानक अॅक्शन मोडमध्ये आला, अशी टीका एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी नुपूर शर्मा वाद प्रकरणावरुन भारतीय जनता पक्षावर केली आहे. भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यावरुन देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर संताप व्यक्त केला जात आहे. (Asaduddin Owaisi Criticize Prime Minister Narendra Modi Over Religious Party)

तसेच भारतीय मालावर बंदी घालण्याची मागणी केली गेली. या सर्व घडामोडींमुळे भाजपने (BJP) नुपूर शर्मावर निलंबनाची कारवाई केली आहे. पुढे ओवैसी म्हणाले, आखाती देशांमध्ये हे प्रकरण तापू लागल्याने नाईलाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपल्या राष्ट्रीय प्रवक्त्याविरोधात कारवाई केली. हे चुकीचे आहे. कारण त्यांनी ही कारवाई १० दिवसांपूर्वीच करायला हवी होती.

तुम्ही माझे पंतप्रधान आहात, तुम्हाला माझे ऐकायला हवे, असे मोदींना उद्देशून असदुद्दीन ओवैसी म्हणाले. तुम्ही परदेशी नेत्यांना खूश करु इच्छित आहात. तुम्ही त्यांचे दुःख समजू शकता, तुम्हाला आमचे दुःख समजू शकणार नाही, असा टोला ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्री मोदी यांना लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI व्यवहारांवर MDR चार्ज लावण्याच्या निर्णयानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी! कारण काय?

गोकुळच्या 25 जागांसाठी रणसंग्राम! महायुतीत धुसफूस, मुश्रीफांचा भाजपला इशारा?

गेल्यावेळी मुंबईत धिंगाणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Short Circuit Suspected Behind Fire : आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण : शॉर्टसर्किटमुळे घराला आग; दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

SCROLL FOR NEXT