Asaduddin Owaisi Team eSakal
देश

"मुस्लिमांचा फक्त प्यादं म्हणून वापर, हिंसा रोखण्यात सरकार अपयशी"

बीरभूम हिंसाचारावरुन ओवैसींनी पश्चिम बंगाल सरकारवर आरोप केले.

सुधीर काकडे

पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये घडलेल्या घटनेवरून एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पश्चिम बंगाल सरकावर टीका केली आहे. बीरभूममध्ये जे काही घडलं त्यावरून हे दिसून येतं की, सरकार मुस्लिमांचा प्यादे म्हणून वापर करतंय. एकाच राजकीय पक्षाचे दोन गट हिंसाचार करतात, ज्यामध्ये लहान मुलांसह अनेक लोक मारले जातात हे निषेधार्ह आहे. बंगालमधील हिंसाचार नियंत्रणात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं असं एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज बीरभूम जिल्ह्यातील बोगतुई (Bogtui) गावाला भेट दिली. यावेळी ममता म्हणाल्या की, बहाणे चालणार नाही, जे या घटनेसाठी जबाबदार आहेत, त्यांना तात्काळ ताब्यात घ्या. बंगालमध्ये हे असं होऊ शकतं असं मला कधीच वाटलं नव्हतं. तसंच हे मोठं षडयंत्र असल्याचा आरोप करत बॅनर्जी यांनी कठोर कारवाईची घोषणा केली आहे. तसंच हत्येमागील कारणांचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर आवैसींनी सरकारवर टीका केली आहे.

आज ममता बॅनर्जी यांनी या भागाची पाहणी करतानाच एका उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्याला फोन केला. तक्रारींची उत्तरं देण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांना शिक्षा व्हायला हवी, असं त्यांनी या अधिकाऱ्याला स्पष्ट सांगितलं. "मला कोणताही बहाणा नकोय. दोषींना अटक व्हावी आणि चुकलेल्या पोलिसांना शिक्षा व्हावी, अशी माझी इच्छा आहे. तसंच घटनेच्या साक्षीदारांनाही पोलिसांनी संरक्षण दिलं पाहिजे" असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, पश्चिम बंगालमधील बीरभूम हत्याकांडाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. आयोगानं याप्रकरणी सुओमोटो याचिका दाखल करुन घेतली असून आयोगाकडूनच या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT