Asaduddin Owaisi News esakal
देश

Asaduddin Owaisi : महाराष्ट्रातील 'या' दोन शहरांची नावं बदलताच ओवैसी संतापले; म्हणाले, इतिहासाशी छेडछाड..

महाराष्ट्र सरकारच्या वतीनं (Maharashtra Government) दोन शहरांची नावं बदलण्यात आली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

आमचं क्षेत्र आमची जनता ठरवेल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे नाही, असं ओवैसी म्हणाले.

Asaduddin Owaisi News : महाराष्ट्र सरकारच्या वतीनं (Maharashtra Government) दोन शहरांची नावं बदलण्यात आली आहेत. यावरुन आता AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी (Asaduddin Owaisi) एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

आमचं क्षेत्र आमची जनता ठरवेल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे नाही, असं ओवैसी म्हणाले. महाराष्ट्रातील शिंदे सरकारनं राज्यातील औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) या दोन शहरांची नावं बदलण्याचा निर्णय घेतलाय. औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव (Dharashiv) करण्यात आलं आहे.

'इतिहासाशी छेडछाड करणं चुकीचं'

ओवैसी म्हणाले, 'सरकार फक्त ठिकाणं, उद्यानं आणि शहरांची नावं बदलत आहे. इतिहास चांगला असू शकतो, वाईट असू शकतो; पण इतिहास हा इतिहास असतो. त्याच्याशी छेडछाड करणं चुकीचं आहे. जगभरातील हेरिटेज वास्तू आपल्या औरंगाबादमध्ये आहेत. या निर्णयाचा प्रत्येक स्तरावर फरक पडेल, सर्व कागदपत्रं बदलावी लागतील.'

'आमचं क्षेत्र आमची जनता ठरवेल'

आम्ही नामांतराविरुध्द यापूर्वी मोर्चा काढला होता, लोकांनीही विरोध केला होता. आज सरकारकडं संख्याबळ आहे, ते लोकांना विश्वासात न घेता काहीही करत आहेत. ही हुकूमशाही आहे. आमचं क्षेत्र आमची जनता ठरवेल. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे नाही, असंही ओवैसी म्हणाले.

नामांतराला केंद्र सरकारची मान्यता

केंद्र सरकारनं औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्याच्या प्रक्रियेला मान्यता दिलीये. नाव बदलाबाबत महाराष्ट्र सरकारच्या मागण्या केंद्र सरकारनं मंजूर केल्या आहेत, त्यामुळं आता औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pali News : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा सूत्रधार शोधण्यासह इतर मागण्यांचे तहसीलदारांना अंनिसकडून निवेदन

School Blast: शाळेबाहेर स्फोटके! विद्यार्थ्याने फेकताच भीषण स्फोट, महिला आणि विद्यार्थी जखमी

Maharashtra Latest News Update: मंडणगडमधील महावितरणच्या जागेतील खैराची पुन्हा चोरी

SCROLL FOR NEXT