उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमिवर राजकीय हालचालींना वेग आलेला दिसतोय. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. यावेळी ओवैसी यांनी राज्यातील दलित आणि मुस्लीम समाजावरील अत्याचाराच्या मुद्यावरून सरकारवर टीका केली.
"आकडेवारी हे दिसून येतं की, उत्तर प्रदेशमध्ये दलितांनंतर मुस्लि समुदायावर सर्वात जास्त अन्याय झाला." असं वक्तव्य ओवैसी यांनी केलं. तसंच ते पुढे म्हणाले की, तुम्ही तुमच्या एका नेत्याची निवड करणे आणि एका झेंड्याखाली राहणे आवश्यक आहे. लोकशाहीतील सर्वात मोठं शस्त्र हे राजकारण आहे. राजकारणातूनच विकासाचे सर्व मार्ग सापडतात असंही ते म्हणाले.
एमआयएमला भाजपची टीम बी असल्याच्या आरोपावर देखील त्यांनी यावेळी उत्तर दिलं. आमच्या पक्षाला एमआयएमची बी टीम म्हटलं जातं. मात्र ते विसरतात की सपा, बसपा आणि काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळेच भाजपला यश मिळतं असा आरोप त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.