Asaduddin Owaisi Latest marath News Sakal
देश

एक दिवस भारतातही लोकं PM निवासस्थानात घुसतील अन्...; ओवैसींचा हल्लाबोल

अग्निवीर योजना असेल किंवा शेतकरी आंदोलन असेल लोकं रस्तावर उतरून सरकारप्रती असलेला असंतोष बाहेर येऊ लागला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : संजय राऊतांच्या अटकेनंतर त्याचे पडसाद राज्यसभेतही पहायला मिळाले आहे. राज्यसभेतील खासदारांच्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहाचे कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजप सरकारवर निशाणा साधत भारतावरही श्रीलंकेसारखी वेळ येईल आणि लोकं पंतप्रधान कार्यालयात घुसतील असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

(Asaduddin Owaisi On BJP)

सरकारने महगाई, बेरोजगारी या प्रश्नावर तोडगा काढला नाही. त्यामुळे आता येथील लोकं रस्त्यावर उतरू लागले आहेत. अग्निवीर योजना असेल किंवा शेतकरी आंदोलन असेल लोकं रस्तावर उतरून सरकारप्रती असलेला असंतोष बाहेर येऊ लागला आहे. "बेरोजगारीच्या मुद्द्यावर उद्या लोकं पंतप्रधान कार्यालयातही घुसतील आणि पंतप्रधानाला म्हणतील की, मला नोकरी का नाही दिली?" असं मत ओवैसीने व्यक्त केलं आहे.

सभागृहाचे कामकाज वर्षातले फक्त ६० ते ६५ दिवस चालते आणि त्यातही जर सभागृहाचं कामकाज अशा प्रकारे स्थगित होत असेल तर आम्ही आमचे प्रश्न कसे मांडायचे असा सवाल ओवैसी यांनी केला आहे. दरम्यान राजस्थानमधील कन्हैयालाल यांची नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे समर्थन केल्यामुळे हत्या करण्यात आली होती. ज्यावेळी कन्हैयालाल याने पहिल्यांदा पोलिसांत तक्रार दाखल केली होती त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली असती तर हा प्रकार घडला नसता असं वक्तव्य त्यांनी यावेळी बोलताना केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT