Asaduddin Owaisi Asaduddin Owaisi
देश

'ते' ताजमहलच्या खाली मोदींची डिग्री शोधतात; ओवैसींचा टोला

भारत ना माझा आहे, ना मोदी-शहांचा, ना ठाकरेंचा. भारत कोणाचा असेल तर द्रविड आदिवासींचा आहे असं ते म्हणाले.

दत्ता लवांडे

नवी दिल्ली : सध्या देशात मशिद आणि मंदिरावरून वाद सुरू आहेत. काशी, मथुरा येथील मशिदी या मंदिरे पाडून बांधल्या असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान ताजमहल हाही हिंदू मंदिर पाडून बनवला आहे असाही आरोप करण्यात आला. एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी यासंदर्भात टीका करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

(Asaduddin Owaisi On Narendra Modi And Tajmahal Controversy)

मुंबईत काल (शनिवारी) एमआयएमची सभा झाली, त्यावेळी ओवैसी बोलत होते. देशात चाललेल्या धार्मिक ध्रुवीकरणार बोट ठेवत त्यांनी भाजपाला आपल्या टीकेचा धनी बनवलं. मशिद आणि मंदिराच्या वादावर बोलताना, "ते ताजमहल खाली पंतप्रधान मोदींची डिग्री शोधत आहेत." असा टोमणा त्यांनी लावला आहे. काही आठवड्यांपूर्वी ताजमहलचा हा वाद समोर आला होता. ताजमहल मधील 'त्या' २२ बंद खोल्याचं राज काय आहे ते शोधण्याची मागणी केली जात होती.

भाजपाच्या एका नेत्याने ताजमहलच्या संदर्भातील याचिका कोर्टात दाखल केली होती. ताजमहल हे शिवमंदिर पाडून बांधले असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. त्यानंतर १२ मे रोजी कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती. अशा गोष्टी इतिहासकारांवर सोडल्या पाहिजेत असं म्हणत कोर्टाने भाजप नेत्याची याचिका फेटाळून लावली होती. पुढे बोलताना ओवैसी म्हणाले की, "भाजपा सारखं जगातील विविध भागांतून मुघल भारतात कसे आणि कधी आले यावर बोलत असतो. केवळ द्रविड आणि आदिवासी हे भारतातील स्थानिक आहेत." असं ते म्हणाले.

"भारत ना माझा आहे, ना मोदी-शहांचा, ना ठाकरेंचा. भारत कोणाचा असेल तर द्रविड आदिवासींचा आहे. पण प्रत्यक्षात आफ्रिका, इराण, मध्य आशिया, पूर्व आशियामधील लोकांनी भारतात स्थलांतर केल्यावर भारताची निर्मिती झाली." असा दावा त्यांनी यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Chai-Sutta Culture and Health Risks: चहाच्या टपऱ्यांपासून ट्युमरपर्यंत: भारताची ‘चाय-सुट्टा-ब्रेक’ संस्कृती फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या संकटाला खतपाणी घालत आहे का?

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

SCROLL FOR NEXT