Asaduddin Owaisi 
देश

"सेक्युलर झालेत का? या पक्षांचा ट्रॅक रेकॉर्ड काय" विरोधकांच्या बैठकीत शिवसेना, केजरीवालांच्या उपस्थितीवर ओवैसींचा सवाल

Sandip Kapde

Asaduddin Owaisi : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याच्या उद्देशाने आज बिहारमधील पाटणा येथे 17 विरोधी पक्षांची बैठक झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानी विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले. यावेळी विरोधकांनी भाजपविरोधात रणनीती आखली आहे.

या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण विरोधकांनी एक रोडमॅप तयार केला आहे. जेणेकरून पुढील निवडणुकीत भाजपला सत्तेतून बाहेर फेकता येईल. मात्र भाजपने या बैठकीवर टीका केली आहे. विरोधकांची बैठक म्हणजे फोटो सेशन असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.  एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देखील या बैठकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, विरोधकांच्या बैठकीत शिवसेना आहे. ते सेक्युलर झाले आहेत का? त्या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. कलम 370 हटवण्यासाठी त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता.

विरोधकांच्या बैठकीत नितीश कुमार आहेत जे एनडीएकडून मुख्यमंत्री झाले होते. आम्हालाही 2024 मध्ये मोदी देशाचे पंतप्रधान बनवायचे नाहीत, पण या पक्षांचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे? काँग्रेसला पुढे राहायचे आहे. नितीश कुमार पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत आहेत, असे ओवैसी म्हणाले.



बैठकीत नेमकं काय ठरलं?


बिहारची राजधानी पटना इथं ही महत्वाची बैठक सुरु असून या बैठकीत 17 विरोधी पक्षांचे प्रतिनिधींनी हजेरी लावली आहे. या बैठकीत काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानुसार, सर्व पक्षांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम अर्थात किमान समान कार्यक्रम हाती घेण्याचे ठरलं आहे. या कार्यक्रमात अनेक मुद्द्यांचा समावेश असेल.

विरोधकांच्या एकतेला धोका?



विरोधकांच्या एकजुटीत 17 पक्षांचा समावेश असला तरी अनेक विरोधीपक्षांनी यापासून दूर राहणं पसंद केलं आहे. यामध्ये त्यांच्या काही वैयक्तिक राजकीय भूमिका आडव्या येत असाव्यात. पण त्यामुळं विरोधकांच्या एकजुटीला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चर्चाही सुरु झाली आहे.

वंचित बहुजन आघाडी (प्रकाश आंबेडकर), भारत राष्ट्र समिती (के. चंद्रशेखर राव), एमआयएम (असदुद्दीन ओवैसी), बहुजन समाज पार्टी (मायावती) हे पक्ष जर स्वतंत्रपणे लढले तर विरोधकांच्या एकजुटीला धोका निर्माण होऊ शकते, अशी भीती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी बैठकीत व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT