Asaduddin Owaisi said, what will BJP say about Nupur Sharma case
Asaduddin Owaisi said, what will BJP say about Nupur Sharma case Asaduddin Owaisi said, what will BJP say about Nupur Sharma case
देश

‘गुजरातप्रकरणी क्लिनचिट दिल्याने भाजप खूश; नूपुर शर्मावर काय बोलणार’

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भाजप (BJP) गुजरातच्या क्लिनचिटवर एवढी चर्चा करते, मग नूपुर शर्माच्या निर्णयावर काय बोलणार आहे. नूपुर शर्माला अटक करावी, अशी माझी पंतप्रधानांकडे मागणी आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल असताना का वाचवले जात आहे, असा प्रश्न एमआयएमचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी भाजपला केला. (Asaduddin Owaisi said, what will BJP say about Nupur Sharma case)

प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या (BJP) निलंबित नेत्या नूपुर शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. १) फटकारले. त्यांच्यामुळे लोकांच्या भावना भडकल्या व देशभरात दुर्दैवी घटना घडल्या, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने नूपुर शर्माबाबत केलेल्या टीकेनंतर विरोधी पक्ष भाजपवर हल्लाबोल करीत आहे.

भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा का बनवला आहे. या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वेळ गप्प बसणार? कायद्याला आपले काम करू द्या. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आज जे म्हटले त्याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले.

नूपुर शर्मा या हैदराबादमधील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अजूनही सदस्य आहेत. तुम्ही नूपुर शर्माला वाचवत आहात आणि दुसरीकडे झुबेरला अटक करीत आहात. एकीकडे एका महिलेला वाचवत आहात दुसरीकडे महिलेच्या नावावर असलेले घर पाडत आहात, असेही असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले.

देशाची माफी मागितली पाहिजे

नूपुर शर्मा यांनी देशाची माफी मागावी, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. नूपुर शर्मा यांनी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान प्रेषित मोहम्मद यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे देशभरात निषेध करण्यात आला. तसेच अनेक आखाती देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर भाजपने शर्मा यांना पक्षातून निलंबित केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT