aimim asaduddin owaisi on rss mohan bhagwat statement over gyanvapi mosque row  
देश

RSS ने तिरंग्याच्या रंगांना अशुभ म्हटलेलं तुम्हाला मान्य आहे का? ओवेसींचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ‘हर घर तिरंगा’ मोहिमेवरून राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक वाद झाला होता. त्यात आता AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची भर पडली आहे. ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. यावेळी ओवेसी यांनी भाजपला अनेक प्रश्न विचारले. (asaduddin owaisi news in marathi)

ओवेसी म्हणाले की, जुलै 1947 मध्ये आरएसएसचे मुखपत्र ऑर्गनायझर मॅगझिनने एका लेखात म्हटले होते की, तिरंगा राष्ट्रध्वज नसून भगवा ध्वज असावा. त्याच वेळी, ऑर्गनायझरने ऑगस्ट 1947 च्या अंकात म्हटले होते की तिरंग्याचे तीन रंग अशुभ आहेत. त्याचा विपरीत मानसिक परिणाम होतो. यावर पंतप्रधान मोदी आणि आरएसएस याला सहमत आहेत का? असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला.

ओवेसी म्हणाले की, भाजपवाले तिरंग्याबाबत म्हणतात की जो तिरंगा फडकावणार नाही, त्यांच्या निष्ठेवर शंका घेतली जाईल. ऑर्गनायझर मासिकातील त्या लेखाबद्दल भाजप आणि आरएसएसची भूमिका काय, हे आम्ही विचारत आहोत. केवळ डीपी लावून देशावरील प्रेम सिद्ध होईल का? 15 ऑगस्टनंतर झेंडा निघाला तर प्रेम कमी होईल का? तिरंग्यावर जन्मजात प्रेम असावं लागत असही ओवेसी यांनी नमूद केलं.

ओवेसी म्हणाले की, १९३० मध्ये तिरंगा जेव्हा आकार घेऊन स्वतंत्र्य सैनिकांनी बनवल्यानंतर तत्कालीन आरएसएस सरसंघचालक म्हणाले होते की, तिरंग्याचे समर्थन करू नका, भगव्याला पाठिंबा द्या.भाजपवाल्यांना वाटतं आम्हाला काही माहिती नाही. मात्र आम्ही देखील इतिहासाचे विद्यार्थी आहोत. त्यामुळे थोडफार आम्हालाही ठावूक असल्याचा दावा ओवेसी यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

IND vs ENG 3rd Test: रिषभ पंतने २५ मिनिटं नेट्समध्ये फलंदाजी केली, पण...! जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स, Video

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

SCROLL FOR NEXT