Asaram Bapu esakal
देश

Asaram Bapu: आणखी एका बलात्कार प्रकरणात आसाराम दोषी! उद्या होणार फैसला

२०१३च्या बलात्कार प्रकरणात सेशन्स कोर्टानं आसारामला दोषी ठरवलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : स्वयंघोषीत संत आसाराम बापूच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. कारण आणखी एका बलात्कार प्रकरणात सेशन्स कोर्टानं त्याला दोषी ठरवलं असून उद्या यावर निकाल देणार आहे. तर याच प्रकरणात दुसऱ्या एका आरोपीची निर्दोष मु्क्तता केली आहे. (Asaram Bapu convicted in rape case the court decision will be announced tomorrow)

काय आहे प्रकरण? कोर्टानं काय म्हटलंय?

सन २०१३ मध्ये आसारामवर सूरतमधील एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. तर या पीडितेच्या छोट्या बहिणीवर नारायण साई यानं बलात्कार केल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसारामसह त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा हे आरोपी आहेत. यावेळी आसारामनं व्हर्चुअली कोर्टात हजेरी लावली. सुनावणीनंतर कोर्टानं आसारामला दोषी ठरवलं.

शिक्षेवर शिक्षा....दिलासा मिळण्याची आशा नाहीच

आसाराम यापूर्वीच्या एका बलात्कार प्रकरणात सध्या जोधपुरच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात आसारामनं जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. पण कोर्टानं त्याची याचिका फेटाळून लावली होती. वयोमानामुळं वारंवार तब्येत बिघडत असल्याचं कारण त्यानं यासाठी दिलं होतं. पण त्याच्यावरील गंभीर गुन्हा पाहता कोर्टानं त्याला जामीन नाकारला. त्यानंतर आता सूरतमधील बलात्कार प्रकरणातही आसारामला शिक्षा सुनावली जाणार आहे, त्यामुळं आसारामच्या अडचणीत कमी होणार नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup विजेत्या लेकीच्या कामगिरीने वडिलांची शिक्षा होणार माफ; ‘क्रांती’ ठरतेय कुटुंबाच्या आनंदाचं कारण

Mali Violence: मालीमध्ये अल-कायदा आणि आयसिसचा दहशतवाद! ५ भारतीयांचे अपहरण अन्...; नेमकं काय घडलं?

'या' दिवशी बोहोल्यावर चढणार सुरज चव्हाण; कुठे आहे लग्न? उरलेत काहीच दिवस; समोर आली अपडेट

ED seizes properties of Congress MLA : मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस आमदाराची कोट्यवधींची मालमत्ता ’ED’कडून जप्त!

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील सोसायटीतील लिफ्ट अचानक कोसळली

SCROLL FOR NEXT