Asaram Bapu Spouse
Asaram Bapu Spouse  sakal
देश

Asaram Bapu : आसारामची मुलगी चालवते आता त्याचं आश्रम; पत्नीवरही झाले होते गंभीर आरोप

सकाळ डिजिटल टीम

Asaram Bapu Spouse : आसाराम बापूला दोन दिवसाआधी एका बलात्कार केस प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मा्त्र हे पहिल्यांदा नाही तर याआधीही आसारामला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवलं होते. आता पुन्हा एकदा बलात्कार प्रकरणी दोषी ठरवल्यामुळे आसाराम बापू चांगलेच चर्चेत आहे.

आसारामला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा नारायण साई सुद्धा बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत आहे. तुम्हाला वाटेल मग आसारामचं आश्रम कोण चालवतोय? तर आसारामचं आश्रम त्याची मुलगी भारतीश्री चालवते. पण आसारामच्या मुलीवर आणि पत्नीवरही गंभीर आरोप झाले होते. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. (Asaram Bapu spouse his wife and daughter have allegations now running ashram Ahmedabad)

मुलगी आणि पत्नी चालवते आश्रम

४३ वर्षीय आसारामची मुलगी श्रीभारतीश्री जी अहमदाबाद आणि देशभरात असणाऱ्या आसारामच्या आश्रमांना सांभाळते. ती नाट्यमय प्रकारे प्रवचन करते, नृत्य करते, गायन करते. फुलांनी त्याप्रमाणेच श्रृंगार करते ज्याप्रमाणे तिचे वडिल करायचे.

आसाराम आश्रम यूट्यूब वर ऑफीशिअल चॅनलचं नाव संतश्री आसाराम बापू आश्रम आहे. आश्रमची आरती संबधीत अन्य गोष्टी दररोज यूट्यूबवर पोस्ट केल्या जातात. भारतीश्री ते सर्वकाही करते जे गर्दी जमा करण्यासाठी पारंगत असणारे संत करतात. ती हात उचलून गर्दीतल्या लोकांना प्रोत्साहन करण्याचा प्रयत्न करते. प्रवचनाच्या मध्ये मध्ये गीत गाते अन् नृत्य करते. प्रवचन करताना ती खूप मोठी आणि अनुभवी संत वाटते.

भारतीश्रीची आई म्हणजेच आसारामची पत्नी लक्ष्मीदेवी सुद्धा आश्रमच्या कामात सक्रीय असते. मात्र ती मुली सारखी अॅक्टीव्ह नाही.

मुलगी आणि पत्नीवर होते गंभीर आरोप

आसारामची मुलगी आणि पत्नीवर आसारामला मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता. असं ही म्हणतात की पीडितांनी आरोप केल्यानंतर भारती आणि लक्ष्मीदेवी फरार झाली होती पण भारतीश्रीने नेहमी हे आरोप फेटाळून लावले.

भारतीच ती व्यक्ती होती जी आसारामनी सांगितल्याप्रमाणे मुलींना आश्रममधून त्यांच्याजवळ पाठवायची. एका अमृत प्रजापतिने असाही आरोप लावला होता की आसाराम भारतीला फोन करायचा आणि ती गाडीने मुली आणायची मात्र एका इंटरव्ह्यूमध्ये भारतीने या आरोपाचे खंडन केले आहे.

15 डिसेंबर 1975 ला जन्मलेल्या भारतीने फक्त 12 वर्षाची असताना दीक्षा घेतली आणि फिर १४ वर्षापर्यंत ध्यान केलं. त्यानंतर ती दरबार भरवायची. ती एम कॉम पर्यंत शिकलेली आहे. एवढंच काय तर तीने संसार थाटायचाही प्रयत्न केला. 1997 मध्ये भारतीने डॉक्टर हेमंतसोबत लग्न केले. मात्र हे लग्न फार दिवस टिकले नाही. आता ती तिच्या आईसोबत आश्रमचं कामकाज बघते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

SCROLL FOR NEXT