MLA Aminul Islam esakal
देश

'औरंगजेबनं 400 हून अधिक मंदिरांसाठी जमीन केली होती दान'

सकाळ डिजिटल टीम

'इतर मुघल शासकांनीही मंदिरं आणि पुजाऱ्यांसाठी जमिनी दान केल्या होत्या.'

मुघल शासक (Mughal Ruler) औरंगजेब (Aurangzeb) धर्मांधतेसाठी ओळखला जातो, परंतु आसाममधील (Assam) ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटच्या आमदाराचा एक वेगळाच दावा आहे. इतिहासापेक्षा वेगळा दावा करत आमदार अमीनुल इस्लाम (MLA Aminul Islam) यांनी सांगितलं, की औरंगजेबानं 400 मंदिरांसाठी जमीन दान केली होती. या मंदिरांपैकी एक म्हणजे, गुवाहाटीचं प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिर (Kamakhya Temple) आहे. मंगळवारी ANI शी बोलताना अमीनुल इस्लाम म्हणाले, मुघल राजवटीत देशानं जे पाहिलं, ते एका इतिहासकारानं आपल्या पुस्तकात नमूद केलंय. औरंगजेबानं त्याकाळात 400 हून अधिक मंदिरांसाठी जमीन दान केली होती, असा दावाही त्यांनी केलाय.

AIUDF चे आमदार इस्लाम पुढे म्हणाले, इतर मुघल शासकांनीही मंदिरं आणि पुजाऱ्यांसाठी जमिनी दान केल्या होत्या. यातील एक कामाख्या मंदिर आहे. हजारो वर्षांपासून धर्मनिरपेक्षतेची भावना देशात आहे. 1947 पासून ते सुरू झालेलं नाही. आसामचे मुख्यमंत्री म्हणाले होते, भारत 1947 पासून धर्मनिरपेक्ष आहे. याला प्रत्युत्तर देताना इस्लाम म्हणाले, ज्यांनी भारतावर राज्य केलं त्यांनी धर्मनिरपेक्षता पाळली. मात्र, हिंदू राज्यकर्त्यांच्या काळात मुस्लिम वर्गातील लोक त्यांच्या श्रद्धेसाठी मोकळे होते आणि तशीच परिस्थिती मुस्लिम राज्यकर्त्यांच्या काळातही होती, असं त्यांचं म्हणणं आहे.

'पवित्र आसाम' या पुस्तकात म्हंटलंय, की औरंगजेबच्या दरबारातील एका अधिकाऱ्यानं जमिनी दान करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या दाव्यावर आक्षेप घेत मुख्यमंत्र्यांनी मला धमकावण्याऐवजी हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या आसाम साहित्य सभेला धमकावलं पाहिजे, असंही इस्लाम म्हणाले. हजारो राज्यकर्त्यांच्या काळात धर्मनिरपेक्षता आली आहे, त्यामुळं स्वातंत्र्यानंतरच देशात धर्मनिरपेक्षता आली, असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJPचा दिल्लीत एल्गार! अभिजीत दीपकेंच्या पक्षाकडून ५ सप्टेंबरला मोर्चाची घोषणा; काय आहेत मागण्या?

NEET PG Admit Card 2026: ३० ऑगस्टला होणार नीट पीजी परीक्षा; डायरेक्ट लिंकवरून 'असे' डाऊनलोड करा हॉल तिकीट...

भारत-पाकिस्तान सीमेवर ‘तारिणी’चं शूटिंग! बॉर्डरवर शूटिंग करणारी ‘तारिणी’ ठरली पहिली मराठी मालिका!

Marathi News Live Updates : अंमलबजावणी संचालनालयाने आंध्र प्रदेशचे माजी नागरी पुरवठा मंत्री आणि माजी आमदार कारुमूरी वेंकट नागेश्वर राव यांना अटक केली

Palghar Ashramshala: गडचिराेलीनंतर पालघरच्या आश्रमशाळेत धक्कादायक घटना; ७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, १९ जणांना ताप

SCROLL FOR NEXT