bjp flag 
देश

मुस्लीम अन् हिंदूंच्या जमिनीच्या व्यवहारांसाठी आता लागणार मुख्यमंत्र्यांची मंजुरी; भाजप शासित राज्याने केली घोषणा

Assam Chief Minister Himanta Biswa Sarma: ज्यांचा जन्म आसामामध्ये झालाय त्यांनाच सरकारी नोकरी मिळेल अशी तरतूद करण्यात येईल असं ते म्हणाले आहेत. 'द हिंदू'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

कार्तिक पुजारी

Assam Guwahati News: आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात जन्म झालेल्या लोकांनाच सरकारी नोकरी मिळेल अशी घोषणा त्यांनी केली आहे. ज्यांचा जन्म आसामामध्ये झालाय त्यांनाच सरकारी नोकरी मिळेल अशी तरतूद करण्यात येईल असं ते म्हणाले आहेत. 'द हिंदू'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

शर्मा यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जमीनीचे हस्तांतरण करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांची मंजुरी बंधनकारक करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. निवडणुकीपूर्वी दिलेले सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत. स्थानिक लोकांसाठी १ लाख सरकारी नोकऱ्या देण्यात येतील असंही ते म्हणाले.

हिंदू आणि मुस्लिमांमध्ये जमिनीचा व्यवहार आपण रोखू शकत नाही, पण यापुढे मुस्लीम किंवा हिंदूंना जमिनीचे देवाण-घेवाण करायची असेल तर मुख्यमंत्र्यांची मंजुरी घ्यावी लागेल. याआधी राज्य सरकारने दोन धर्मातील व्यक्तींच्या जमीन व्यवहाराला नो-ऑबजेक्शन सर्टिफिकेट देण्याचे तीन महिन्यांसाठी टाळले होते. सरकारचा हा निर्णय वादाचा ठरण्याची शक्यता आहे.

लव्ह जिहादसाठी कठोर कायदा

हेमंत बिस्व शर्मा यांनी कथित लव्ह जिहाद संदर्भात देखील नव्या तरतुदीची घोषणा केली आहे. यापुढे लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येणार आहेत. अशाच प्रकारचे विधेयक उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आले आहे. लव्ह जिहाद ही टर्म उजव्या विचारसरणीच्या लोकांनी वापरली आहे. यात मुस्लीम व्यक्तीसोबत प्रेम किंवा लग्न याचा समावेश होतो.

शर्मा यांनी राज्यातील वाढत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशमधून अनेक मुस्लीम आसाममध्ये आले आहेत. ते स्वत:ला स्थानिक लोक म्हणत आहेत, असा दावा शर्मा यांनी केलाय. यासंदर्भात कठोर नियम करणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT