hemant biswa sharma esakal
देश

Manipur Violence: 'भारतीय लष्कर मणिपूरमध्ये काहीही करु शकत नाही'; आसामच्या मुख्यमंत्र्याचे वक्तव्य

Manipur Violence: भारतीय लष्कर मणिपूरमध्ये काहीही करु शकत नाही, असं वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी शुक्रवारी केलंय.

सकाळ डिजिटल टीम

गुवाहाटी- भारतीय लष्कर मणिपूरमध्ये काहीही करु शकत नाही, असं वक्तव्य आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी शुक्रवारी केलंय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना मणिपूरमधील हिंसाचार भारतीय लष्कर एक ते दोन दिवसांत थांबवेल, असं म्हटलं होतं. याचा संदर्भ देत सर्मा म्हणाले की, मणिपूरमध्ये गेल्या शंभर दिवसांपासून सुरु असलेला हिंसाचार भारतीय लष्कर थांबवू शकत नाही. राज्यात बंदुकीने नाही, तर प्रेमातून आपल्याला ही समस्या सोडवता येईल.(Assam chief minister Himanta Biswa Sarma said Indian Army will not be able to solve anything in Manipur)

भारतीय लष्कर मणिपूरमधील समस्या सोडवेल असं म्हणत आहेत. पण, मणिपूरमधल्या नागरिकांवर सैन्याने गोळीबार करावा असं राहुल गांधी यांना सुचवायचं आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केल्याप्रमाणे मिझोराममध्ये १९६६ मध्ये हवाईदलाच्या माध्यमातून बॉम्बहल्ला करण्यात आला होता. त्याचप्रमाणे मणिपूरमधील नागरिकांवर हल्ला करावा अशी इच्छा राहुल गांधी यांची आहे का, असा प्रश्न आसाम मुख्यमंत्र्यांनी विचारला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

सर्मा पत्रकारांना म्हणाले की, राहुल गांधी यांना मणिपूरमधील हिंसाचार भारतीय सैन्याच्या माध्यमातून सोडवायचा आहे. याचा अर्थ नागरिकांवर गोळीबार करावा का? राहुल गांधी हेच सुचवत आहेत का? लष्कर काहीही करु शकणार नाही. याने समस्या थोड्या काळासाठी सोडवता येईल.पण, तुम्हाला कायम स्वरुपी यावर तोडगा काढायचा असेल तर बंदुकीच्या गोळीच्या माध्यमातून नाही तर प्रेमाने ही समस्या सोडवता येईल.

विरोधक म्हणत होते की, पंतप्रधान मोदी यांनी मणिपूर विषयावर लोकसभेत बोलावं, पण जेव्हा त्यांनी बोलायला सुरुवात केली तेव्हा विरोधक संसद सोडून गेले. यातून विरोधकांचा हेतू समोर आला. त्यांना मणिपूरशी काही देणंघेणं नाही, त्यांना फक्त संसदेत गोंधळ निर्माण करायचा आहे. त्यांना मणिपूरबाबत प्रेम नाही, त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. पंतप्रधान मोदी मनातून बोलत होते. त्यांना खरंच ईशान्येकडील नागरिकांबाबत प्रेम आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Accident: आईला घेण्यासाठी आलेल्या दोघांवर काळाचा घाला; खुलताबाद रस्त्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीच्या धडक, दोन्ही मित्र ठार

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरणातून आज सकाळी ९,४३२ क्युसेक विसर्ग; गोदावरी खोऱ्यातील गावांना सतर्कतेचा इशारा

Nagpur Crime : महिलेला करायला लावली नग्न पूजा, व्हिडिओ बनवला अन्...नागपुरात भोंदूबाबाचा प्रताप उघड, 'असं' शोधायचा सावज

Neeraj Chopra: ऑलिंपिक पदकविजेता नीरज चोप्राची ब्रुसेल्स स्पर्धेतून माघार, पण अंतिम फेरीत दाखवणार आपला दम

Mahabaleshwar Rain Update; 'महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस'; भिलारमधील शाळेचा स्लॅब कोसळला, ग्रामस्थांची धावपळ

SCROLL FOR NEXT