ips robin kumar 
देश

सलाम! रुग्णसेवेसाठी धावला वर्दीतला डॉक्टर; पोलिस अधीक्षकाने जिंकली मने

सकाळ वृत्तसेवा

गुवाहाटी - आसाममध्‍ये कोरोनाचे संकट वाढत असताना वर्दीतील डॉक्टर जागा झाला आणि त्याने अनेक रुग्णांवर उपचार करीत बरे केले. डॉक्टरच्या रूपात धावून आलेल्या या भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्याने आसाममधील नागरिकांची मने जिंकली आहेत. या अधिकाऱ्याचे नाव रॉबिन कुमार असे असून ते बारपेटा येथे पोलिस अधीक्षकपदी कार्यरत आहेत.

कुमार हे १९९३ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी एम.बी.बी.एसचे शिक्षण घेतलेले असून औषधशास्त्र या विषयात एम.डी पदवी मिळविलेली आहे. या वैद्यकीय ज्ञानाचा वापर करण्याची संधी त्यांना सध्याच्या कोरोना काळात मिळाली. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण आलेला असताना रॉबिन कुमार हे रुग्णांच्या हाकेला धावून जात असून त्यांच्यावर उपचारही करीत आहेत. पोलिस अधिकारी आणि डॉक्टर अशा दुहेरी पातळीवर लोकसेवा करीत असल्याने कुमार यांचे सर्वत्र कौतुक होत आहेत.

जिल्हा पोलिसाची जबाबदारी पेलत असताना रॉबिन कुमार हे पोलिस व त्यांच्या कुटुंबांसाठी राखीव असलेल्या बारपेटा पोलिस राखीव दलातील ५० खाटांचे कोरोना उपचार केंद्र आणि चार खाटांची आयसीयू केंद्राची जबाबदारीही सांभाळात आहेत. महिला व ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजनही करण्याचा त्यांचा विचार आहे. रॉबिन कुमार हे मूळचे उत्तर प्रदेशमधील गाझियाबादचे आहेत. आसाम पोलिस दलात प्रवेश केल्यानंतर त्यांनी तेजपूर येथे आरोग्य शिबाराचे आयोजन केले होते.

आसाममधील पोलिस योद्ध्याने विश्‍वास जिंकली आहे. बारपेटातील पोलिस अधीक्षक रॉबिन कुमार यांनी त्यांचे वैद्यकीय शिक्षणाचा उपयोग करीत कोरोनाविरोधातील लढ्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत केली आहे. यातून मानवेतेच्या सेवेचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.
सर्वानंद सोनोवाल, मुख्यमंत्री, आसाम

‘‘कोरोनाव्हायरसचा प्रसार होण्यास सुरुवात झाल्यानंतर मी आसामचे पोलिस महासंचालक भास्कर जोशी महंत यांना बारपेटातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी कोरोनो उपचार केंद्र उभारण्याची परवानगी मागितली होती. आता हे केंद्र व्यवस्थित सुरू झाले आहेत.जिल्हा पोलिस प्रमुख व डॉक्टर अशा दोन्ही भूमिका निभावू शकतो हे माझे भाग्यच आहे. यामुळे मला मोठे समाधान मिळत आहे, ’’ असे रॉबिन कुमार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT