Assam Meghalaya Border Dispute End Agreement ANI
देश

आसाम-मेघालयमधील ५० वर्षांचा सीमावाद मिटणार, ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आसाम आणि मेघालयमध्ये (Assam Meghalaya Border Dispute) गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेला सीमावाद आता संपुष्टात येणार आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी आज हा वाद मिटविण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी (Assam Meghalaya Border Dispute End Agreement) केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीमावाद सोडविण्यासाठी दिशा दिली. आज पहिल्या टप्प्यातील ठराव पूर्ण झाला आहे. तसेच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्यामुळे हे शक्य झाले आहे, असं मेघालयचे मुख्यमंत्री संगमा म्हणाले. करारावर स्वाक्षरी केल्यानंतर ते बोलत होते.

ऐतिहासिक दिवस - अमित शाह

“आज आसाम आणि मेघालय यांच्यातील 50 वर्षांचा प्रलंबित सीमा विवाद सोडवण्यात आला आहे. विवादाच्या 12 पैकी 6 मुद्द्यांचे निराकरण करण्यात आले आहे, ज्यात सीमेच्या जवळपास 70 टक्के भागांचा समावेश आहे. उर्वरित 6 मुद्दे लवकरात लवकर सोडवले जातील. आज आंतरराज्यीय सीमा समझोत्यावर स्वाक्षरी करणे हा ईशान्येसाठी ऐतिहासिक दिवस आहे'', असे अमित शाह म्हणाले.

1972 मध्ये आसाममधून मेघालय वेगळे झाल्यानंतर जमिनीचा वाद उफाळून आला होता. नवीन राज्याच्या निर्मितीसाठी सुरुवातीच्या करारामध्ये सीमा समस्या उद्भवल्या. हाच वाद आता संपुष्टात येणार आहे. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ३१ जानेवारीला केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तपासणी आणि विचार करण्यासाठी एक मसुदा पाठवला होता. त्यानंतर दोन्ही मुख्यमंत्र्यांची गृहमंत्र्यांसोबत चर्चा झाली. त्यानंतर आज निर्णय घेऊन करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT