Period Rituals sakal
देश

Period Rituals : आसाममध्ये मुलींना पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर काय करतात?

आसाममध्ये मुलींना पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर काय करतात, हे जाणून घ्या

निकिता जंगले

Period Rituals : मासिक पाळी ही प्रत्येक महिलेच्या आयुष्याचा भाग आहे. बायोलॉजीनुसार मुलीला एका ठराविक वयानंतर मासिक पाळीला सामोरे जावे लागते. मासिक पाळी आल्यानंतर काही ठिकाणी उत्सव साजरा केला जातो तर काही ठिकाणी प्रथा पाळत मुलींवर बंधने लादली जातात.

तुम्हाला माहिती आहे का पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर अनेक राज्यात वेगवेगळ्या प्रथा पाळल्या जातात. आज आपण आसाममध्ये मुलींना पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर काय करतात, हे जाणून घेणार आहोत. (Assam Period Tradition Rituals when girls get their first period)

  • मुलींना पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर काही राज्यात आनंद, उत्सव साजरा केला जातो. आसाममध्येही तुम्हाला आनंद करताना दिसणार. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

  • आसाममध्ये पहिल्यांदा मुलीला मासिक पाळी आल्यानंतर तुलोनिया बिया नावाचा उत्सव साजरा केला जातो.

  • तुलोनिया बिया या उत्सवादरम्यान मुलीला सात दिवस एका खोलीत ठेवतात आणि त्या खोलीत इतर कुणालाही जाण्यास परवानगी नसते.

  • पिरेड्स दरम्यान मुलीला खायला फळ दिले जाते. ती दिवसातून एकदाच शिजवलेले अन्न खाऊ शकते.

  • तुलोनिया बियाच्या चौथ्या दिवशी मुलीची अंघोळ घातली जाते. अंघोळीसाठी हळदीच्या पाण्याचा वापर केला जातो. अंघोळीच्या ठिकाणी आधीच केळीचं झाड लावले जाते.

  • पाचव्या आणि सहाव्या दिवशी आजुबाजूच्या महिला मुलीला पिरेड्सविषयी माहिती सांगतात आणि सर्व गोष्टी 'बिया नाम' या गीतद्वारे सांगितली जाते.

  • पिरेड्स आल्यानंतर काही लोक कार्ड्सही छापतात आणि आनंद शेअर करतात.

  • तुलोनिया बियामध्ये मुलीला साडी नेसून दिली जाते आणि दागदागिने घालून तिचा मेकअप करून दिला जातो.

अशाप्रकारे आसाममध्ये मुलींना पहिल्यांदा मासिक पाळी आल्यानंतर असा तुलोनिया बिया उत्सव साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT